बदलापूर नगरपालिका भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती गठीत,, समिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची आंदोलकांची मागणी,,

कुळगाव बदलापुर नगरपालिके मध्ये विविध विकासकामांत झालेल्या निधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करत लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ पासून बदलापुर नगरपालिका कार्यालया समोर बेमुदत लाक्षणिक साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते, दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेऊन बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री आणिल पडवळ यांच्या उपस्थितीत आंदोलनकर्त्यांंशी चर्चा करून सदर भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करून येत्या १५ दिवसात कारवाई करण्याचे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले आहे
याच अनुषंगाने मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांनी चौकशी समिती स्थापन केली असून या समिती मध्ये कुळगाव बदलापुर नगरपालिकेचे लेखापाल विकास वेजीनाथ चव्हाण यांची समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून लेखापरीक्षक शुभाष शांताराम नागप आणि पाणी पुरवठा अभियंता सुरेंद्र शामलाल ऊईके यांची समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
परंतु सदर समिती बाबत लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हरकत घेण्यात आली असून या समिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी दोन्ही संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देवून केली आहे,सदर समिती मध्ये नियुक्ती केलेले अधिकारी हे याच पालिकेमध्ये कार्यरत असल्याने त्यांच्या कडून पारदर्शक तपास होणार नसल्याने समिती मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश होणे गरजेचे असल्याचे मत लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी व्यक्त केले आहे,
या बाबत मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांना देखील त्या बाबत निवेदन सादर केले असून पालिकेच्या निधित झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी ही निःपक्ष करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी देखील मा, जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यालयातुन दोन अधिकारी समिती मध्ये सामाविष्ट करण्यासाठी विंनती करावी अशी मागणी लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे प्रदेश सचिव श्री भरत कारंडे व वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे, या अनुषंगाने लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश या समिती मध्ये करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे श्री दत्ता गायकवाड यांनी सांगितले आहे,सदर समितीला पंधरा दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे यांनी दिले असुन, चौकशी पारदर्शक होऊन दोषिंवर कारवाई होण्याची अपेक्षा लोकपालक पत्रकार सुरक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री प्रदीप गोविंद रोकडे, सचिव भरत कारंडे, वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केली आहे
१) बदलापुर पश्चिम अग्निशमन दलाच्या नुतनीकरण करण्यासाठी केलेल्या एक कोटी अकरा लाख रुपयांची चौकशी करून कारवाई करणे
२) बदलापुर पश्चिम बॅरेजरोड वार्ड क्रमांक २३ येथील ओपन/ जिम गार्डन साठी खर्च करण्यात आलेल्या चाळीस लाख रुपयांच्या निधीची चौकशी करून कारवाई करणे
३) बदलापुर शहरातील खड्डे भरण्यासाठी करण्यात येत असलेल्या दिड कोटी रुपयांची चौकशी करून कारवाई करणे
४) बदलापुर पश्चिम हेंद्रेपाडा येथील नगरपालिकेच्या जागेवरील लोकप्रतिनिधींच्या आधिपत्याखाली झालेले अतिक्रमण हटवणे तसेच अयोध्या नगरी ते मानव पार्क रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण हटवणे
अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या आंदोलकांनी केलेल्या असुन आता मुख्याधिकारी यांनी गठित केलेली समिती आता कशा प्रकारे चौकशी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे