शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे संबोधित करणार?

मुंबई प्रतिनिधी! या वर्षी मुंबईत शिवाजी पार्क मध्ये कोणत्या शिवसेना गटाचा दसरा मेळावा होणार याचीच चर्चा राज्यभरात सुरू आहे, शिवसेनेच्या दोन्ही गटा कडून पालिका प्रशासनाकडे दसरा मेळाव्याच्या परवानगी साठी अर्ज सादर करण्यात आले आहेत, परंतु पालिका प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने या वर्षी शिवाजी पार्कवर नक्की कोणत्या गटाचा मेळावा होणार या कडे संपूर्ण राज्याच लक्ष लागून राहिल आहे, परंतु दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या कडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे,कोणत्या भागातुन किती कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्या येण्याची व्यवस्था कशी करायची, कोणत्या गेटने आता सोडायचे कोणत्या गेटने बाहेर सोडायचे या बाबत नियोजन सुरू आहे तर शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या मेळाव्याला संबोधित करत होते आणि त्या नंतर उध्दव ठाकरे यांनी या मेळाव्याची कमांड संभाळली आहे, या वर्षी मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानी मात्र मोठाच पेच प्रसंग निर्माण केला आहे, शिवाजी पार्क वरचा दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा श्वास आहे, राज्यभरातील लाखो शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होत असतात, या कारणामुळे शिवसेनेच्या ताकदीचा अंदाज लावला जातो, एकनाथ शिंदे यांना देखील याच निमित्ताने आपली ताकद दाखवायची असल्याने शिवाजी पार्कवर मेळाव्याची परवानगी मिळवण्यासाठी आपल्या मुख्यमंत्री पदाची शक्ती वापरणार आहेत हे मात्र नक्की झाले आहे, परंतु उध्दव ठाकरे यांनी देखील मेळाव्याला परवानगी मिळण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली असल्याने सत्ता आणि न्यायासन या मध्ये कोणाचा विजय होतो हे आता लवकरच बघायला मिळणार आहे, एकनाथ शिंदे यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी मनसे नेते राज ठाकरे यांना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री बंगल्यावर मनसे नेते राज ठाकरे यांनी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आहे तर एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणरायाच दर्शन घेतले आहे, या दोन्ही भेटी दरम्यान एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याकडे दसरा मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आग्रह धरला असल्याचे बोलले जात आहे, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते अमित शहा यांनी नुकताच मुंबई दौरा केला असताना अमित शहा यांनी फक्त भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडली असल्याने शिंदे गट एकटा पडल्याची भावना निर्माण झाल्याने शिंदे गटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच आधार वाटु लागल्याने दसरा मेळाव्याला राज ठाकरे यांना आणण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे,