ग्राहकांच्या विश्वासामुळेच डोंबिवली नागरी सह. बँक,कुळगाव शाखेने त्रेपन्न वर्षात पदार्पण केले..व्यवस्थापक राजू विजापूरे.!*

( पत्रकार तात्यासाहेब सोनवणे मुंबई यांजकडून ०६ सप्टेंबर २२) *अर्थाला विश्वास मिळे अन् विश्वासाला अर्थ मिळे*! या बॅंकेच्या सहकाराच्या बोधसंदेशानुसार,आज मितीला ग्राहकांच्या विश्वासामुळेच ५६००/- कोटी रुपयांपेक्षा आर्थिक व्यवहार करून उच्चांक गाठला आहे.एवढेच नाही तर महाराष्ट्र राज्यात चौसष्ट शाखा कार्यरत आहेत. बावन्न वर्षाचा वर्धापनदिन साजरा करताना ‘ग्राहक जोडो” अभियान सुरू केले आसून ,DNS py App, internet banking system,mobile banking, च्या माध्यमातून देशातील अन्य राज्यातील ग्राहकांच्या पसंतीस आपली बॅंक उतरली आहे,देश, विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज वाहन कर्ज, गृहनिर्माणासाठी कर्ज, एवढेच नाही तर, अन्य व्यवसायासाठी, आमच्या बँकेने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे.यामुळेच उद्योजक, कारखानदार, जेष्ठ,नागरिक, विद्यार्थी,अर्थात सर्वसामान्यालाही डोंबिवली नागरी सहकारी बँक कायम आपलीच वाटत आहे.आमच्या सेवांचा लाभ घेताना काही अडचणी आल्यास तात्काळ मला कळविण्यात याव्यात त्यांचे शंभर टक्के समाधान करण्यासाठी मी कटीबद्ध आहे.असे श्रीमान विजापूरे साहेब कुळगाव शाखा बँक व्यवस्थापक यांनी उद्योजक धनंजय म्हात्रे यांच्याशी बातचीत करताना अश्वाशित केले आहे.