येवल्यात गुटखा विक्रेत्यांवर पोलिसाची कारवाई, सुमारे अकरा हजार रुपयांचा माल जप्त,
नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-: येवला शहरात – विंचूर चौफुली परिसरात अवैध विक्री सुरू असलेला गुटखा, सुगंधी पान मसाला याच्यावर शुक्रवारी दि. ४ ऑगस्ट रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या टीमने धाडसी कारवाई करीत मुद्देमाला सह विक्रेत्याला ताब्यात घेतले आहे.गुटखा तंबाखूमुळे तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे. तरी बंदी घालण्यात आलेला गुटखा, सुगंधी तंबाखू विक्री करू नये यासाठी नेहमी कारवाई होत असते. मात्र परराज्यातून हा माल चोरट्या मार्गाने येत आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सदैव कारवाई करीत आहे. विंचूर चौफुली येथील दया पान सेंटर येथे गुटखा विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली यात ऋतिक संतोष राऊत वय २२ यास विमल, माणिकचंद, राजनिवास आदी गुटखा विक्री करताना रंगेहाथ
पकडले. त्याच्या कडून सुमारे अकरा हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला या कारवाईत जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस निरीक्षक अंकिता बाविस्कर, पोलिस हवालदार. गोरख पवार, पो. ना. नितीन डावखर, महिला पो. मनीषा कुजूरे, जगदीश कडाळे, मदन रामराजे, महेश पवार आदींनी ही कारवाई केली.