राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन येत्या २३ संप्टेबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे होणार….

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार भवन आझाद मैदान मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन दि. 23 सप्टेंबर 23 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉईट मंत्रालय समोर मुंबई येथे होणार असल्याची मोठी घोषणा केली.
*#या अधिवेशनाचा मुख्य उद्देश हा देशांतर्गत चाललेले प्रस्थापितांचे स्वार्थी राजकारण आणि महापुरुषांच्या अडून देशांमध्ये जातीपातीमध्ये धर्मामध्ये वाढवला जाणारा द्वेष याला विरोध करून अशा राजकारणाला छेद देत आंबेडकरवादी विचारसरणीच्या समस्त जनतेला एकत्रित करण्यासाठी व रिपब्लिकन ताकद नव्याने प्रस्थापित करण्यासाठी हा या अधिवेशनाचा प्रमुख उद्देश आहे अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली…*
या पत्रकार परिषदेमध्ये पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गिरीषजी अकोलकर, महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे, मुंबई प्रदेश प्रभारी वसंतराव वाघमारे, मुरबाड विधानसभेचे नेते विठ्ठल चौधरी, मुंबई प्रदेश सचिव विश्वासराव कांबळे, युवा नेते प्रशांत जी कटारे, मुंबई प्रदेश संघटक युवती आघाडी आलिया खान, मुरबाड तालुका नेते पांडेजी, रिक्षा युनियन अंधेरी तालुका अध्यक्ष मोहम्मद खान, मानखुर्द शिवाजीनगर तालुका अध्यक्ष रवींद्र रोकडे, मानखुर्द महाराष्ट्र नगर वार्ड कोषाध्यक्ष दस्तगीरजी मिर्झा, मानखुर्द महाराष्ट्र नगर वार्ड सचिव शिवाजी पिंपळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…