आपला जिल्हा

आमदार किसन कथोरे यांचे बदलापूर इंडस्ट्रीज वेलफेअर असोशिएशनच्या शिष्टमंडळाने मानले आभार.!.

(तात्यासाहेब सोनवणे यांजकडून ०७ ऑगस्ट २०२३)

आमदार किसन कथोरे आमदार मुरबाड यांची, बदलापूर येथील जनसंपर्क कार्यालयात जाऊन औद्योगिक विकास महामंडळातील, बदलापूर येथील नवनिर्वाचित अध्यक्ष कुशालशेठ जैन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज भेट घेतली. यावेळी औद्योगिक क्षेत्राला भेडसावणाऱ्या अडचणी, मांडताना पाणी पुरवठा, वीजपुरवठा,सुरळीत रहावा,याकडे आमदार महोदयांनी लक्ष द्यावे,आशी विनंती करण्यात आली.याव्यतिरिक्त बदलापूर इंडस्ट्रीज वेलफेअर असोसिएशनच्या कार्यालयाला महामंडळाने दिलेली जागा, कार्यान्वित नसल्यामुळे त्या जागेचा ताबा रद्द करून,महामंडळाकडून विकण्याचे घाटत होते. पण वेळीच आमदार कथोरे साहेबांनी लक्ष घातल्याने, कार्यालय पूर्वनिर्धारित होईल, व त्याचा हक्क वरील वेलफेअर असोसिएशनला राहिल. असे आश्वासित केल्यामुळे, वेलफेअर अध्यक्ष मा. कुशालशेठ जैन, मा. सोहेल शेठ, मा. राकेश बक्सी सर, मा. गुप्ता सर, मा. अॅड. हेमंत पारसकर, माजी अध्यक्ष आर. शक्ती सर,यांनी आभार मानले.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कुशालशेठ जैन यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी अध्यक्ष शरद तेली साहेब यांनी करून, भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.