नाशकात खुनाचे सत्र सुरुच अंबड पोलिस स्टेशन च्या हद्दीत १५ दिवसात दुसरा खुन , सिडकोतील शिवाजी चौकात युवकाचा चाकू भोसकून खून; अंबड हद्दीत महिन्याभरात खूनाची चौथी घटना नविन नाशिक हादरले,,,
नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक -:नविन नाशिक परीसरातील
सिडकोतील शिवाजी चौकात २३ वर्षीय युवकाचा दोन दुचाक्यांवरून आलेल्या सहा संशयितांनी धारदार हत्याराने वार केले तसेच, पोटात चाकू भोसकून खून केल्याची घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून सदरची घटना घडल्याचे समजते.दरम्यान, गेल्या महिनाभरात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खूनाची ही चौथी घटना असून, पोलीस निष्क्रियतेमुळे सिडकोत गुन्हेगारी बोकाळली आहे.
संदीप प्रकाश आठवले (२३, रा. सिडको) असे मयत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप आठवले हा शिवाजी चौकात असताना दोन दुचाक्यांवरून सहा संशयित आले.त्यांनी काही दिवसांपूर्वी इंदिरानगर परिसरात झालेल्या भांडणाची कुरापत काढून वाद घातला. त्यातून संशयितांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी संदीपवर वार केले. तर एकाने चाकूच संदीपच्या पोटात भोसकला.संदीप कोसळताच संशयितांनी पोबारा केला. जखमी संदीपला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणात तीन संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. संशयितांची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
दरम्यान, अंबड पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच गुन्हेगारी बोकाळली असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक न राहिल्याने गुन्हेगारांचीच दहशत नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
अंबडच्या स्वामीनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून मयूर केशव दातीर या तरुणाची तिघांनी मिळून निर्घृण हत्या करण्यात आली होती
सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत बुधवारी प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना ताजी असतांना गुरुवारी अंबड परिसरातही हत्येचा प्रकार घडल्याने नाशिक पुन्हा एकदा हादरले आहे.मयूर दातीर दुचाकीवरून महालक्ष्मीनगर येथे हनुमान मंदिराजवळ आला असता त्याच्या मागावर असलेल्या आणि चार चाकीवरूनच आलेल्या तिघांनी मयूरच्या छाती व पोटावर चाकूने सपासप वार केले.
दरम्यान घटनेचे वृत्त कळताच पोलीस उपायुक्त राऊत, प्रशांत बच्छाव,अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह अन्य ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. हल्लेखोरांचा कसून शोध घेतला जात आहे.