लोकनेते आमदार किसन कथोरे यांना नामदार करावे ही ठाणे जिल्ह्यातील मतदारांची मागणी.!
( तात्यासाहेब सोनवणे ठाणे यांजकडून )

ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष ते अंबरनाथ, मुरबाड,दोन दशकं महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळात आमदार लक्षवेधी कारकीर्द,मंत्रालय,कोकणभवन,जिल्हा प्रशासनावर आपल्या विकास योजना राबविल्यामुळे पकड, तळागाळातील,अदिवासी, गोरगरीब,ते उद्योजक ,औद्योगीक श्रेत्रात,कामगार,जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारा नेता,महाराष्ट्रातील २८८ आमदारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर विक्रमी मतांनी विजयी झाले.
नुसते विजयी झाले नाहीत तर, ठाणे जिल्ह्यात सेना, कांग्रेस, राष्ट्रवादीचे अस्तित्व नावापुरते ठेवले.याची दखल पक्ष नेतृत्वाने तत्कालीन विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाना पटोले यांच्या विरोधात उतरवून घेतली.हरणार हे माहिती असूनही आमदार किसन कथोरे यांच्यासारख्या मुरब्बी लोकनेत्यानी पक्षाच्या हिताचाच विचार केला.ग्रामीण भागात भारतीय जनता पक्षाला सोनियाचे दिवस आणले. “ध्येय विकासाचे गाठले प्रत्येक पाऊल पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठीच टाकले.”! नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब व ना.एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळात पहिल्या यादीत समावेश आहे याची जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांची भावना होती.कार्यकर्त्यांनी तर गुलाल, फटाके,जंगी स्वागताची तयारी केली होती.एवढेच नव्हे तर ठाणे जिल्हाचे ‘पालकमंत्रीपद’ यावेळी तरी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकनेत्यालाच मिळेल, आसा जिल्हा पदाधिकारी यांना आत्मविश्वास होता. परंतु येथे साता-याचे ना. शंभूराज देसाई यांना आणले. खारघर, जुईनगर, घणसोली, मुंब्रा, कौसा, मीरा, भायंदर, कल्याण, डोंबिवली, किसन नगर, टेंभी नाका, एवढाच ठाणे जिल्हा मर्यादित आहे का? जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून लोकनेते किसन कथोरे यांनी,वांगणी, कासगावं,कोंडेश्र्वर,वाडया, वस्त्या, मुळगाव, सोनिवली,मलंगगड पट्टा, मांडा,टिटवाळा,जव्हार, मोखाडा,सरळगाव, सिध्दगड, म्हसा,मुरबाड, टोकावडा, अहोरात्र मेहनतीने, विकासकामांच्या गतीने,ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष या नात्याने मतदारसंघ पिंजून काढला. पूरग्रस्त,असो की, धरणग्रस्त,विधिमंडळ अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात लक्षवेधी मांडून मतदारसंघातील अनेक,प्रश्नाला वाचा फोडली. अन् आपल्या विचारांचा मतदार जोडला.याची नोंद पक्षीय नोंदवहीत तर घेतलीच, पण प्रदेश पातळीवर जाहिर कार्यक्रमात ,ना.नितिन गडकरी साहेब,ना. चंद्रकांत (दादा)पाटील,ना.देंवेंद्र फडणवीस,केंद्रीय पंचायत राज मंत्री ना. कपिल पाटील साहेब,ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार, तत्कालीन नगरविकास मंत्री,आजचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी जाहीर व्यासपीठावरून घेतली आहेच.मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरच्या मुख्यमंत्री कार्यालयातही, शेतकरी,शेतमजूर, रस्ते,विकास,कामाचे,अदिवासी गोरगरीब लेकींसाठी “आमदार कन्यादान योजना राबवून अनेक लेकीबाळींचे संसार उभे केले.”प्रगती पुस्तक”,जिल्हा नियोजन समिती,जिल्हा माहिती संचालनालयात, “लोकनेते किसन कथोरे ” यांचे उजवे असतानां आशा लोकनेत्याला पक्ष नेतृत्वाने मंत्रीमंडळ विस्तारात यावेळी तरी संधी देवून महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ठाणे जिल्ह्यातील जनभावनेचा आदर करून मंत्रीमंडळात वर्णी लावावी आशी ठाणे जिल्ह्यातील मतदारांकडून मागणी होत आहे.