मलंगगड यात्रेत देखील लाजिरवाणे शक्तिप्रदर्शन : श्री मच्छिंद्रनाथांचा गद्दारांवर कोप होणार !
(जेष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर ९८२२९०२४७०)

शिवसेना प्रमुख हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने धर्मवीर आनंद दिघे यांनी १९८७ सालापासून श्री मलंगगड यात्रा सुरू केली. हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट ! अशी प्रेरणादायी घोषणा देत १९८७ पासून २००१ पर्यंत धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रबळ नेतृत्वाखाली दरवर्षी माघी पौर्णिमेस मलंगगड यात्रा जोमाने निघत असे.
मलंग गडावर अतिक्रमण करून तेथील काही धर्मांध लोकांनी नवनाथांच्या समाधीस हाजी मलंग या पीर बाबाची समाधी असल्याचा भ्रम निर्माण केला.हे धार्मिकस्थळ हिंदूंचे असल्याच्या अनेक खुणा तेथे आहे.परंतू हाजी मलंग की श्री मलंग हा वाद गेल्या ४ दशकांपासून आहे.त्याबाबतचा वाद न्यायालयातही गेला होता.धार्मिक वाद टाळण्यासाठी हे क्षेत्र सर्व धर्मीय प्रार्थनास्थळ मानण्यात आले. मात्र मलंगगड यात्रे खेरीज हिंदू धर्मिय येथे फारसे येत नसल्याने या स्थळावर मुस्लिम बांधवांचा प्रभाव दिसून येतो.हा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने बाळासाहेबांनी दिघे साहेबांमार्फत येथे हिंदूंची वहिवाट निर्माण करण्याच्या उद्देशाने व मुस्लिम बांधवांचे वर्चस्व रोखण्याच्या उद्देशाने मलंग गड यात्रेची वहिवाट निर्माण केली. धर्मवीरआनंद दिघे साहेबांच्या निधना नंतर ही यात्रा हळुहळु क्षीण होत गेली.
मिधेंनी गद्दारी करून शिवसेना संपविण्याच्या कुटनीतीमुळे शिवसेनेचा दसरा मेळावा, टेंभी नाक्यावरील नवरात्रौत्सव,दही हंडी व आनंद आश्रम हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्याच धर्तीवर काल “श्री मलंग गड यात्रा” देखील हायजॅक करण्याचा लांच्छनास्पद प्रयत्न केला. वारेमाप पैश्यांचा वापर करत पावलो पावली सुमारे १० किमी.परिसरात बॅनर,होर्डिंग व ढाल तलवारीचे चित्र असेले भगवे झेंडे लावुन नसलेल्या शक्तिचे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.मलंग गडाच्या पायथ्याशी जागोजागी तंबु ठोकून मिंधे समर्थकांची “सोय” केली. ती पंचारांकित सोय सत्तेमुळेच करता आली व ती सत्ता गद्दारीने मिळवली आहे हे दिघे साहेब व मच्छिंद्रनाथांना देखील ठाऊक आहे.दिघे साहेब हार्ट अटॅक येऊन गेल्या नंतरही पायी गड चढून मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेत.मुख्यमंत्री पदाची झुल पांघरलेले शिंदे हेलीपॅडवर उतरले,दर्शन घेतानाचे फोटोसेशन केले व परतले.पायथ्याशी त्यांची सभा झाली तेंव्हा १५० लोकही नव्हते,हे मी स्वत: पाहिले. दिघे साहेब नुसते उभे राहिले तरी हजारांचा जमाव जमत असे.
काल मिंधे सेनेचे जे तथाकथित नेते व कार्यकर्ते आले होते त्यातील किती महाभागांनी दर्शन घेतले हा संशोधनाचा विषय आहे. चिंधीचोर शहर प्रमुख रमेश चव्हाण व सुरेश जाधव हे लोक तर मला मी परतत असताना वाटेत दिसले.त्याच्या किती तरी आधी त्यांचे लाडके नेते “दर्शन” घेऊन निघुन गेले होते.असे असंख्य समर्थक भाडयाच्या बसेस मधुन येत होते व मलंगगड पायथ्यातील तंबुत विसावून पाहुणचार झोडून निसटत होते.त्यातील काही मोजकेच भाविक गडावर पोहचले असावे.
एकीकडे मिंधे गटाचा राजेशाही थाट तर दुसरीकडे कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक स्वखर्चाने मलंगगडावर आले होते.दरवर्षी प्रमाणे मंडपात जमुन भेटीगाठी करून मच्छिंद्र
नाथांच्या जयजयकाराच्या घोषणा देत गडावर कुच करीत होते.
सात महिन्यांपुर्वी ज्या शिवसैनिकांत जीवाभावाचे नाते होते ते एकमेकाकडे परक्या वा शत्रूपक्षाच्या भावनेने पाहत होते किंवा पाहणे टाळत होते. एका गद्दार व अतिमहत्वाकांक्षी माणसाने भावा-भावांत बहिणी-बहिणीत व भावा- बहिणींत दरी निर्माण करण्याचे महापातक केले होते.
शिवसैनिकांना मंडपात प्रवेश करताना नेमके कुठे जाऊ ? हे समजत नव्हते ! कारण माणसं तिच होती परंतू गटातटात विभागलीे गेलेली. मग झेंड्यावरील निशाणी व बॅनरवरील फोटू हे मिंध्यांचे पाहून ती मंडळी तिकडे वळत होती तर निष्ठावंत मशाल व उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे फोटो पाहून हे तर आपले हक्काचे ठिकाण ! म्हणत तिथे येऊन जय महाराष्ट्राचे आदान-प्रदान करीत होती.
हे दृश्य खुपच वेदनादायी होते.
श्रीमलंगगडावर अशी जीवाभावाच्या नात्यांत दरी निर्माण करणा-या कलुष्याला दिघे साहेबांनी व श्री मलंगगडावरील मच्छिंद्रनाथांनी नक्कीच शाप दिला असेल.हा शाप त्याला नक्कीच भोवणार. मी दिवसभर मुक्कामाच्या उद्देशाने तिथे गेलो होतो, मात्र हे विदारक दृश्य पाहून दुपारी २.३० वाजताच काढता पाय घेतला.