नाशिकमध्ये गुन्हेगारांच्या १४ टोळीप्रमुखासह सदस्यांची चौकशी २० टोळ्यांना मोक्का लावणार, धात्रक टोळीला मोक्का,
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पाचव्या टोळीवर केली मोक्का कारवाई,,

(नाशिक शांताराम दुनबळे)
नाशिक-: शहर व परीसरात सण उत्साहाच्या पार्श्वभुमीवर गुन्हेगारीवर नियञंण ठेवण्याकरीता शहरातील १४ संघटींत टोळ्याच्या प्रमुखासह टोळीच्या सदस्य यांची चौकशी सुरु असुन वर्ष अखेर पर्यंत शहरातील२० टोळ्यावर मोक्का लावण्यात येणार असल्याची माहीती शहर पोलिस आयुक्त मा अंकुशजी शिंदे सो यांनी दिली ़सहाय्यक पोलिस आयक्त कार्यालयाकडुन कारवाई सुरु असुन शहराती वाढती गुन्हेगारीनियञंणात ठेवण्याकरता पोलिस यञंणाकडुन दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारावर तडीपारी ,एमपीडीएची कारवाई सुरु आहे म्हसरूळमधील चाणक्यपुरीमध्ये २२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या धात्रक टोळीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गुरुवारी (दि.७) मोक्का कारवाई केली. पोलीस आयुक्त शिंदे यांनी मोक्का कायदयान्वये पाचव्या गुन्हेगारी टोळीस जेरबंद केले आहे. मुख्य आरोपी व गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार गणेश बाबूराव धात्रक हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याचे साथीदार दर्शन गोरख गायकवाड (रा. राममंदिर मागे, मातोरी, ता. जि. नाशिक), अभिषेक अनिल गिरी (रा. स्वामी विवेकानंदनगर म्हसरुळ नाशिक), आकाश पांडुरंग चारोस्कर (रा. मातोरी, कोळीवाडा, ता. जि. नाशिक) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. ६ ऑगस्ट २०२३ रोजी म्हसरुळमध्ये चार आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्यांनी व शस्ञाने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने जखमी केले होते. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी व गुन्हेगारी टोळीचा सुत्रधार गणेश बाबूराव धात्रक हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याचे साथीदार दर्शन गोरख गायकवाड, अभिषेक अनिल गिरी, आकाश पांडुरंग चारोस्कर यांनी गुन्हेगारी टोळी निर्माण केली. संघटितरित्या घातक हत्यारे जवळ ठेवून नाशिक शहरातील म्हसरुळ, पंचवटी, उपनगर, भद्रकाली, व नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत लोकांना अवैधरित्या शस्त्र बाळगून धमकावून मारहाण करणे, खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, अपहरण करणे, दंगा करणे, घातक शस्त्रानिशी असे बाळगत होतेे
टोळीवर १७ गुन्हे दाखल
टोळी प्रमुख मुख्य आरोपी गणेश बाबूराव धात्रक याने गुन्हा करताना टोळीतील सदस्यांच्या सहाय्याने | हिंसाचाराचा, अवैध शस्त्रांचा वापर करून धाक दाखवून परिसरात वर्चस्व निर्माण केली. त्याने स्वतःची व टोळीची दहशत कायम ठेवण्यासाठी | बेकायदेशीर कृत्य चालू ठेवले. टोळीतील |सदस्यांविरुध्द एकूण १७ गुन्हे म्हसरुळ, पंचवटी, | उपनगर, भद्रकाली, व नाशिक तालुका पोलीस ठाणे अंतर्गत दाखल झाले आहेत. दंगा करणे, या प्रकारे परिसरात गुन्हे करुन टोळीची दहशत निर्माण केली. टोळीप्रमुख व सदस्यांनी नियोजित कट रचून गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांनी संघटित गुन्हा केल्याने पोलीस आयुक्त शिंदे यांनी आरोपीविरूध्द मोका कारवाई केली
६ ऑगस्टला अशी घडली होती हल्ल्याची घटना
गौरव थोरात (वय २२, रा. ओमकार नगर, अनन्या हाईट्स, किशोर सुर्यवंशीमार्ग, म्हसरूळ शिवार) हा मित्रा समवेत चाणक्यपुरी येथील नोव्हल्टी हेअर सलून बाहेर बसला होता. त्यावेळी संशयित गणेश धात्रक, दर्शन गायकवाड, अभिषेक गिरी, आकाश चारोस्कर आले त्यावेळी त्यांच्यात मागील घटनांवरून शाब्दिक बाचाबाची झाली. संशयित गणेश धाञक, दर्शन गायकवाड,अभिषेक गिरी, यांनी गौरवला मारहाण केली. तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर व मानेवर मारून जखमी केले होते त्यानंतर परिसरात दहशत निर्माण केली आणि पोबारा केला होता.सण उत्साहाचा आगामी काळ लक्षात घेत पोलिस यञंणेकडुन गुन्हेगारी नियञणांत आणण्यासाठीवेगाने विविध उपाय योजना केल्या जात आहे