धर्मनिरपेक्ष पक्षांनी रिपब्लिकन विचारधारेशी प्रतारणा करू नये- अण्णासाहेब कटारे

येवला(प्रतिनिधी):- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष येवला तालुका पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक दिनांक 18 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की,
राज्यात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष जनसामान्यांच्या समस्या व प्रश्नांना वाचा फोडत असताना सर्वसमावेशक संविधानिक व्यवस्थेची आग्रही भूमिका घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राज्यात जोमाने कार्य करीत आहे.
पक्षाकडे कार्यकर्ते व जनतेचा वाढता ओघ पाहता पक्षाकडे हिंदुत्ववादी पक्षांनी युतीबाबत प्रस्ताव मांडला आहे.
या प्रस्तावावर बैठकीत चर्चा करण्यात आली
त्यावर कार्यकर्त्यांची भावना जाणून घेत असताना कार्यकर्त्यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांना आजपर्यंत आपल्या पक्षाने केलेले उदंड सहकार्य करूनही धर्मनिरपेक्ष पक्ष आम्हाला दुय्यम दर्जाची वागणूक देतात अशी भावना व्यक्त केली, म्हणून सर्व समाज हिताच्या दृष्टीने पक्षाने हिंदुत्ववादी पक्षा सोबत जाण्याचा सकारात्मक विचार करावा अशी इच्छा व्यक्त केली.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सदस्यता अभियान या उपक्रमाला राज्यभरात भरघोस प्रतिसाद मिळत असून येवला तालुक्यातही येत्या काळात सदस्यता अभियान जोमाने सुरू करण्यात येईल अशे आश्वासन स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिले.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राज्यातील औद्योगिक क्षेत्रात, स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा या मागणीसह राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतीतील, संस्था कंपन्या ,यांच्याशी संवाद साधत असून त्याच धर्तीवर शेतकरी ,छोटे व्यापारी ,सेवा पुरवठादार यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करत आहे.
सदर बैठकीस
*राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, राष्ट्रीय प्रवक्ते गिरीशजी अकोलकर, युवा नेतृत्व बिपिन कटारे, येवला शहराध्यक्ष विजयजी भाटे, युवा नेते येवला तुषार भाऊ वाघ, निफाड तालुका बाबासाहेब फापाळे ,मरळगोई उपसरपंच मनोहरजी बनसोडे,प्रशांत कटारे,अनिल जगताप,निफाड तालुका युवा नेते संदीप बनसोडे, बबन वाघ,कैलास भगवान वाघ, रावसाहेब वाघ, साईनाथ आहिरे ,शंकर वाघ, वाल्मीक खरात, पुंडलिक फाफाळे,संदीप फाफाळे,योगेश फाफाळे,अजय बनसोडे, किरण वाघ,अरुण वाघ ,कैलास वाघ ,नानासाहेब वाघ ,रावसाहेब मुरलीधर वाघ, ऋतिक वाघ ,गौरव वाघ, विकास गांगुर्डे,योगेश गरुड, बबन गांगुर्डे, प्रसाद गांगुर्डे, अविनाश जगताप, नरेंद्र गांगुर्डे, देवेंद्र गांगुर्डे ,प्रतीक गांगुर्डे, संजय रुपवते, योगेश गांगुर्डे ,सौरभ गांगुर्डे ,अविनाश गांगुर्डे ,पुंडलिक गांगुर्डे,*
आदी उपस्थित होते