बदलापूर नगरपालिका अधिकारी, पोलिस अधिकारी आणि गणपती उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न,,

बदलापूर! दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गणरायच आगमन होणार असल्याने गणेशोत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आज दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी कुळगाव बदलापुर नगरपालिका अधिकारी बदलापुर पुर्व आणि पश्चिम पोलिस अधिकारी, महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीचे अधिकारी तसेच बदलापुर शहरातील गणपती उत्सव मंडळांचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बदलापुर पुर्व संजिवनी हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती,
या वेळी ऊल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते, बदलापुर नगरपालिका मुख्याधिकारी श्री योगेश गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ श्री जगदिश सातव, यांनी उपस्थित गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, या वेळी मा, पोलिस आयुक्त ठाणे यांच्या कडून प्राप्त सुचनांबाबत संपुर्ण माहिती ऊपस्थित गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली, गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या विविध अडचणीं बाबत सविस्तर चर्चा करुन त्यावर उपाययोजना करणार असल्याचे पोलीस प्रशासन तसेच पालिका प्रशासना कडुन सांगण्यात आले आहे, बैठकीत बदलापुर पुर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणिल पडवळ, बदलापुर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे, वाहतूक शाखा अंबरनाथ पोलिस निरीक्षक श्री सुखदेव पाटील, बदलापुर फ्रायर ब्रिगेड अधिकारी यांच्यासह शांतता समिती सदस्य,कौमी एकता समिती सदस्य, पोलिस पाटील आणि बदलापूर शहरातील ४५ गणेश उत्सव मंडळांचे सुमारे ७० /८० पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते