ढोके दापिवली शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्षात जल्लोषात साजरा झाला बक्षिस वितरण सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम

दिनांक ३०/०१/२०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा ढोके दापिवली येथे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ तसेच गृपग्रामपंचायत ढोके दापिवली व आंबेशिव खुर्द यांच्या एकत्रिकरणातून वर्षभर अध्ययन करणा-या विद्यार्थी बाळगोपाळांसाठी कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक बक्षिस वितरण सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
*सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली.यावेळी मान्यवर अतिथी म्हणून गावच्या सरपंच सन्माननीय सौ.पूजाताई सचिन गायकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.चंद्राताई रविंद्र भोईर, उपाध्यक्षा-सौ.लतिकाताई गराठे, मा.सरपंच सौ.माधुरीताई भोईर,सौ.योगिताताई सवार,पालक प्रतिनिधी सौ.ज्योतीताई गणेश गायकर,सौ.अर्चनाताई गायकर,सौ.ममताताई गराठे,सौ.योगिताताई गायकर, मा.उपसरपंच श्री.भानुदास गायकर,गावचे पोलिस पाटील श्री.गणेश गायकर,श्री.रविंद्र भोईर, समाज सेवक श्री.सचिन गायकर,श्री.नंदू गायकर,श्री.सुनिल गायकर,सदस्य श्री.अशोक भोईर, श्री.नितिन गायकर,मंडप डेकोरेटर्स श्री.उल्हास गायकर, श्री.जगदिश गायकर (डि.जे.साऊंड सिस्टीम) तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थी,ग्रामस्थ इ.ची प्रमुख उपस्थिती होती
*शाळेचे मुख्याध्यापक श्री.शंकर झाडबुके सर व शाळेचे सेवा जेष्ठ शिक्षक श्री.पांडुरंग पाटील सर यांनी आलेल्या मान्यवर अतिथींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.*
*शाळास्तरावर घेण्यात आलेल्या विविध क्रीडा व विविध गुणदर्शन स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवर अतिथींच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.*
*सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी मित्रांनी एकापेक्षा एक नृत्य अविष्कार सादर केले.विविध डान्स प्रकारासाठी पालकांनी रोख रक्कम देऊन कौतुक केले.
*या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रबोधन पर स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन वर नाटिका सादरीकरण छान पद्धतीने केले.तसेच मुक अभिनय सादर केले.*
*कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे स्वयं सेवक शिक्षक श्री मिलिंद गायकर, कु.सारिका गायकर यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे नवोपक्रमशिल प्राथमिक शिक्षक श्री.आनंद सोनकांबळे सर व शाळेच्या स्वयंसेवक शिक्षिका सौ.राखीताई भोईर यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.*
*सरतेशेवटी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी साथसहयोग दिला त्यात समाजसेवक श्री.नागेश भाकरे साहेब व ग्रामस्थ/शिक्षक दानदाते या सर्वांचे जाहीर आभार मानण्यात आले.वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.