ताज्या घडामोडी

जेष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे ‘ बेस्ट एडोटोरियल 2023 ‘ पुरस्काराने पोलिस दला तर्फे सन्मानित

पत्रकार आणि पोलीस हे एका नाण्याच्या दोन बाजू - डी एस पी श्रीकांत धिवरे*

धुळे:-पत्रकार आणि पोलीस यांचे एकमेकाशी असलेले संबंध आणि पोलीसां प्रमाणेच पत्रकारांवर असलेली जबाबदारी लक्षात घेता , आणि त्यांना द्यावे लागणारे योगदान लक्षात घेता पत्रकारांचा सन्मान करण्याची संकल्पना सुचली,व ती प्रत्यक्षात अंमलांत आणल्याचा मला आनंद होत असल्याचे, प्रतिपादन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी, पत्रकारांच्या सन्मान समारंभात बोलतांना केले.
विविध विषयात नाविण्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील पत्रकारांना, पोलीस विभागा मार्फत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हाटेल ऋतुराज मध्ये सर्वश्री पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उप अधिक्षक ऋषिकेष रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे आदीं मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत , आयोजित या समारंभाचा शुभारंभ, जेष्ठ पत्रकार महेशबाबां घुगे यांच्या हस्ते , बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. सुरवातीला श्रीकांत धिवरे यांनी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात मागची पार्श्वभूमी विषद केली . अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकारांची निवड , निवड समितीने कशी केली हे विषद केले,
आझादनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक , बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पहाडी आवाजात महाराष्ट्र गीत गाऊन , वातावरण प्रफुल्लित केले.

या वेळी सर्वश्री योगेंद्र जुनागडे, हेमंत मदाने, निखील सुर्यवंशी, मनोज गर्दे, यशवंत हरणे, राजेंद्र सोनार, महेश मासोळे, संतोष मासोळे, प्रशांत परदेशी , विजय डोंगरे, धनंजय दिक्षित, गणेश सूर्यवंशी, राम निकुंभ, देवेंद्र पाठक, यांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे हस्ते, सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र व पुष्प गुच्छ, देऊन गौरविण्यात आले.


ऊतरादाखल , पुरस्कार प्राप्त सन्मानार्थीनी, आपले अनुभव सांगितले. योगेंद्र जुनागडे यांचा पुरस्कार स्वीकारणारे त्यांचे चिरंजीव निखील जुनागडे यांनी या पुरस्काराचे श्रेय आपल्या आजीने केलेल्या प्रामाणिकपणाच्या संस्काराला दिले.

धुळे येथे जिल्हा पोलिस दलातर्फे पत्रकारांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकारीता पुरस्कार देण्यात आले. ‘उत्कृष्ट संपादकीय पुरस्कार २०२३ ‘ हा दैनिक पथदर्शीचे संपादक योगेंद्र जुनागडे यांना जाहिर झाला. सदर पुरस्कार जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत घिवरे यांच्या हस्ते स्वीकारताना व्यवस्थापकीय संपादक निखिल योगेंद्र जुनागडे. सोबत अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेष रेड्डी, डीवायएसपी सचिन हिरे, एलसीबी पी. आय. दतात्रय शिंदे आदी.मान्यवर ऊपस्थित होते,
शेवटी एलसीबी पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदिश देवपूरकर यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.