मनोरंजन !! अमिर खानच्या नव्या चित्रपटाची मोठी अपडेट आलीये समोर, चित्रपटाचं नाव ‘सितारे जमी…
प्रतिनिधि :- प्राची जाधव

अभ्यास न करता पास होणे, किंवा अभ्यासाचा कंटाळा करून फक्त आणि फक्त विरंगुळा करत राहणे आणि स्वतःच्याच विश्वात रममान होणे हे प्रत्येक लहान मुलांना आवडत असतं. यावर आधारित 2007 साली ‘अमीर खान’ आणि ‘अमोल गुप्ते’ दिग्दर्शित ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने खूप कमी वेळात सगळ्यांच्याच मनात घर केलं होतं. अशातच बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळख असलेल्या अभिनेता ‘आमिर खान’ याने नुकतच त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘सितारे जामीन पर’ असं त्याच्या नव्या चित्रपटाचं नावं असून, हा चित्रपट ‘तारे जमीन परचा’ दुसरा भाग आहे की काय असा प्रश्न आमिरच्या चाहत्यांच्या मनात आला आहे.
आमिर खानच्या या नव्या चित्रपटाच्या शूटिंगची एक अपडेट समोर आली आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, अमीरचा ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची शूटिंग पुढच्या महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. काही मीडिया अपडेटनुसार या चित्रपटांमध्ये एकूण नऊ मुलं दाखवली जाणार आहे. सोबतच असं सुद्धा समोर आलं आहे की, तारे जमीन पर हा चित्रपट अतिशय भावनिक आणि वैचारिक होता. परंतु सितारे जमीन पर हा चित्रपट इमोशनल नसून थोडाफार कॉमेडी असणार आहे.
त्याचबरोबर तरुणांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ‘जेनिलिया डिसूजा’ ही देखील ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामध्ये झळकनार असल्याचं समजतंय. जेनेलिया आणि अमीर खान हे दोघं पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. अमीर खानने भारताला आतापर्यंत एकशे एक सिनेमे दिले आहेत. ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाचा ट्रेलर कधी येतोय त्याची उत्सुकता चहा त्यांना लागली आहे.