ताज्या घडामोडी

बदलापूर पुर्व अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी कारवाई साठी ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभागाच्या माध्यमातून सहाय्यक पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर,,

बदलापूर पुर्व आदर्श विद्यालयातील अल्पवयीन मुलींच्या विनयभंगाच्या प्रकरणी, संबंधित स्थानिक पोलीस अधिकारी आणि शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी, ठाणे जिल्हा कॉंग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने जिल्हा प्रमुख प्रदीप गोविंद रोकडे यांनी केली आहे,

,आज नुकतेच ठाणे जिल्हा तसेच बदलापुर शहर काँग्रेस पर्यावरण विभागाच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त यांना त्या बाबत निवेदन सादर करण्यात आले आहे, या प्रकरणी बदलापुर पुर्व पोलिस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे कॉंग्रेस पक्षाचे पर्यावरण विभाग प्रमुख प्रदीप रोकडे यांनी म्हटले आहे, शाळा प्रशासन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असुन घडलेल्या सर्व प्रकाराला शाळा प्रशासन जबाबदार असुन घटनेच्या वेळी ऊपस्थित सर्व शाळा व्यवस्थापनाची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असून, बदलापुर पुर्व पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणाची देखील चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे,

या वेळी ठाणे जिल्हा पर्यावरण विभाग सरचिटणीस जगन्नाथ जावळे, ठाणे जिल्हा महिला कॉंग्रेस उपाध्यक्ष आस्था मांजरेकर, ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष असगर खान, बदलापुर शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान , बदलापुर शहर काँग्रेस पर्यावरण विभागाचे सतिश रणदिवे, संतोष भगत यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देताना ऊपस्थित होते,

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.