ताज्या घडामोडी

बदलापूर! अल्पवयीन मुलींच्या लैंगिक आत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या फाशीचा दोर अधिक आवळला,,,

आरोपीची ओळख परेड यशस्वी

बदलापूर! बदलापूर पुर्व आदर्श विद्यालयातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक आत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीचा फाशीचा दोर आता अधिक आवळत चालला असल्याचे दिसून येत आहे, शनिवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी अक्षय शिंदे याला कल्याण न्यायालयात पुन्हा एकदा हजर करण्यात आले होते, या वेळी अत्याचार पिढित अल्पवयीन मुलीं समोर गुप्त पद्धतीने अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यात आली, या वेळी दोन्ही अल्पवयीन मुलींनी या विकृत अक्षय शिंदे याला अचूक ओळखले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, त्या मुळे एस आय टी मार्फत सुरू असलेल्या चौकशीला आता अधिक वेग आला आहे, अक्षय शिंदे या नराधमाला फाशीची शिक्षा होण्याची मागणी करत बदलापुर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन ऊभे राहिले होते, फक्त राज्यभरात नाही तर देशभरात या प्रकराणाचे तिव्र पडसाद उमटले होते, संतप्त आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात आदर्श विद्यालयातील सामानाची तोडफोड करुन आपला संताप व्यक्त केला होता तर तब्बल आठ तास रेल्वे सेवा देखील ठप्प करुन ठेवली होती, प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन, सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले होते,विरोधी पक्षनेते सत्ताधाऱ्यांवर तुटून पडलेले होते,एकिकडे सर्व सामान्य जनतेचा रेटा आणि विरोधकांनी घेतलेला समाचारामुळे अखेर यात दोषी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करुन शाळा प्रशासनावर देखील कडक कारवाई करत शाळा प्रशासनाला देखील या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे,एस आय टी मार्फत चौकशीचे सत्र सुरूच राहणार आहे, परंतु या मध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोपीची ओळख परेड होणे गरजेचे होते,ही प्रक्रिया आता यशस्वीरीत्या पार पडली असुन अक्षय शिंदे याच्या शिक्षेचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे,आता या प्रकरणाला जबाबदार असलेले पोलिस अधिकारी आणि शाळा प्रशासनावर भविष्यात कशा प्रकारे कारवाई होऊन त्यांना कशा प्रकारे शिक्षा होईल, किंवा आरोपी अक्षय शिंदे याला फाशी होईल की जन्मठेपेची शिक्षा होईल हे येत्या काळात स्पष्ट होईल

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.