बदलापूर! अंबरनाथ तालुक्यातील मुळगाव सोनावळा गृप ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारा विरोधात तहसीलदार कार्यालयासमोर ‘”अन्नत्याग आंदोलन” सुरू

बदलापूर ग्रामीण परिसरातील मुळगाव सोनावळा गृप ग्रामपंचायत प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ठाणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने तहसीलदार अंबरनाथ कार्यालया समोर दिनांक ३/९/२०२४ पासून “अन्नत्याग आंदोलन” सुरू करण्यात आले आहे,सोनावळे गावच्या स्थानिक रहिवासी तसेच ठाणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी पर्यावरण विभाग सदस्य सौ, वंदना खंडागळे या सदरच्या उपोषणाला बसल्या आहेत,गृप ग्रामपंचायत मुळगाव सोनावळा हद्दीतील सोनावळे गावामध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप वंदना खंडागळे यांनी केला असून, या मध्ये दोषी असलेल्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वंदना खंडागळे यांनी मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे,
वंदना खंडागळे या सोनावळा गावच्या स्थानिक रहिवासी असताना त्या गावातील रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार बाहेर काढत असल्याने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे धाबे दणाणले असून, वंदना खंडागळे यांनी हा भ्रष्टाचार बाहेर काढु नये म्हणून ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व इतर सर्व सदस्य यांनी मुख्य रस्त्यापासून वंदना खंडागळे यांच्या घरा पर्यंत शासनाने मंजूर केलेला रस्ता बनवुन देण्यास विरोध केला आहे, कोणत्याही परिस्थितीत आपला भ्रष्टाचार बाहेर येऊ नये म्हणून भ्रष्ट ग्रामपंचायत प्रशासना व लोकप्रतिनिधी यांनी स्थानिक आदिवासी बांधवांना हाताशी धरून शासनाने मंजूर केलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करायला लावले असल्याचे वंदना खंडागळे यांनी सांगितले आहे, या बाबत दिनांक ८ एप्रिल रोजी, वंदना खंडागळे यांनी तहसीलदार कार्यालयासमोर सदर रस्त्यांच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे आणि शासनाने मंजूर केलेला हक्काचा रस्ता बनवुन मिळण्यासाठी “आमरण उपोषण सुरू केले असताना,मा, गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ आणि मुळगाव सोनावळा गृप ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांनी वंदना खंडागळे यांच्या मागण्या मान्य करुन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने, कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांची भेट घेऊन या बाबत चर्चा केली असताना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे यांनी कर्तव्यात कसूर करीत असल्याने ग्रामपंचायत प्रशासानावर कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ यांना दिले आहेत,याच अनुषंगाने गटविकास अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ यांनी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना लेखी आश्वासना नुसार कार्यवाही करण्याचे लेखी आदेश देऊन उचित वेळेत कार्यवाही न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायत प्रशासनाला दिले आहे,
असे असताना देखील वरिष्ठांचे आदेश धाब्यावर बसवून ग्रामसेवक यांनी आपला मनमानी कारभार सुरूच ठेवला असुन, राजकीय दबावाखाली येऊन स्थानिक आदिवासी यांना हाताशी धरून, वंदना खंडागळे आणि त्यांचे पती हे मुस्लिम समाजातील असल्याने यांच्यावर खोटेनाटे आरोप करुन त्यांना अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची धमकी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जात असुन समाजामध्ये जातिय तनाव निर्माण करण्याचा प्रयत्न या समाजकंटकांकडुन केला जात आहे,
,तर वंदना खंडागळे यांच्या घरा मागुन बेकायदेशीर रस्ता शेतकऱ्यांना बनवून देण्याच्या नावाखाली त्यांचे राहते घर तोडुन टाकण्याचा प्रयत्न सध्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे, वंदना खंडागळे यांनी आपली बाजू शासनाकडे पुन्हा एकदा मांडली असुन त्यांनी लोकशाही मार्गाने पुन्हा एकदा “अन्नत्याग आंदोलन ” सुरू केले आहे, वंदना खंडागळे यांनी रस्त्यांच्या कामात शासनाच्या निधिवर डल्ला मारणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात खऱ्या अर्थाने हे आंदोलन सुरू केले असून, त्यांना शासनानेच मंजूर केलेला रस्ता मिळावा व शेतकऱ्यांना शेतीसाठी जाणारा रस्ता देखील शासकीय कायद्या प्रमाणेच देण्यात यावा अशी रास्त मागणी शासनाकडे केलेली असताना देखील शासनाची तसेच पोलिस प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा स्थानिक आदिवासींच्या माध्यमातून केला जात असल्याने या बाबत सखोल चौकशी करून कारवाई होणे आवश्यक असल्याने दिनांक ३/९/२०२४ पासून ठाणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्यात आले असून या बाबत तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तिव्र करून तहसीलदार कार्यालयासमोर लवकरच चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे,