आठ वर्षांच्या दलित विद्यार्थ्यांच्या जिवाची किंमत पाच लाख? सरकारच्या निषेधार्थ भिम आर्मीच्या वतीने गुजरात मध्ये तिव्र आंदोलन,,
मडक्यातुन पाणी पिले म्हणून आठ वर्षांच्या दलित विद्यार्थ्यांचा खुन केल्याच्या निषेधार्थ राज्यस्थान सरकारच्या विरोधात गुजरात मध्ये भिम आर्मीचे तिव्र निषेध आंदोलन,,

राज्यस्थान मधिल जालोर मध्ये एका आठ वर्षांच्या दलित मागासवर्गीय मुलाने शिक्षकाच्या मडक्यातुन पाणी पिले म्हणून एका जातीयवादी शिक्षकाने तिसरीत शिकत असलेल्या या आठ वर्षांचा विद्यार्थी इंद्रकुमार मेघवाल बेदम मारहाण केली या मारहाणीत हा आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला
संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी डोक्यावर मडके घेऊन तिव्र निषेध नोंदविला,भिम आर्मी भारत एकता संघटनेचे गुजरात प्रदेश प्रभारी प्रतापभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले, या वेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली असून राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोथ यांना तातडीने मुख्यमंत्री पदावरून हटविण्याची मागणी देशाचे राष्ट्रपती यांच्या कडे केली असून त्या बाबतचे निवेदन भिम आर्मीचे प्रदेश प्रभारी प्रतापभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे,