जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेत महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,ता.भिवंडी येथे दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी ठीक सकाळी 9-30 वाजता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीचे आयोजन करण्यात आले.
महात्मा गांधी यांचे प्रतिमेला ग्रामस्थ योगेश कथोरे तर लालबहादूर शास्त्री यांचे प्रतिमेला ग्रामस्थ किसन पांढरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.
*सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जीवन कार्यावर विचार मांडून अभिवादन केले*
*तद्नंतर तंबाखू, व्यसन मुक्त शपथ विद्यार्थी,पालक व शिक्षक यांनी घेतली*
*जयंती निमित्त वेशभूषा स्पर्धा,परिसर स्वच्छता व विद्यार्थी भाषणे घेण्यात आली*
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी महापुरुषांना अभिवादन केले.
सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले.
जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना चाॅकलेट देऊन तोंड गोड केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते योगेश कथोरे,किसन पांढरे मुख्याध्यापक जगदीश जाधव ,सहशिक्षक अशोक गायकवाड, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.