भिवंडी तालुक्यातील कोशिंबी केंद्राची शिक्षण परिषद शैक्षणिक वातावरणात संपन्न*

जिल्हापरिषद शाळा डोहोळे केंद्र कोशिंबी,ता.भिवंडी येथे शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10-30 शिक्षण परिषद पुष्प चौथे संपन्न झाले.
शिक्षण परिषदचे अध्यक्षपद पदवीधर शिक्षक, प्रभारी केंद्रप्रमुख शामराव पवार यांनी भूषविले.
शिक्षण परिषदेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजीमहाराज, विश्वरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
उपस्थित जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भिवंडी संजय अस्वले,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख नरेश भोईर, प्रभारी केंद्रप्रमुख शामराव पवार,दिव्यांग विषय तज्ञ मनिषा गायकवाड व उपस्थित शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य ,मुख्याध्यापक, सहशिक्षक यांचे गुलाब पुष्प देऊन डोहळे शाळेचे वतीने स्वागत करण्यात आले.
तसेच जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भिवंडी संजय अस्वले यांची आंतरराष्टीय योग स्पर्धेत निवड झाल्याबद्दल कोशिंबी शिक्षक वृंदांचे वतीने पुष्प गुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांनी उपस्थित शिक्षकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्या बाबत व निपुण भारत अभियान राबविण्या संदर्भात प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी प्रगत अप्रगत विद्यार्थी व उपचारात्क वर्ग या विषयावर अभ्यासपूर्ण विचार मांडले.
सदर शिक्षण परिषदेत अनेक शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.अध्ययन निष्पत्ती,विज्ञानपेटी/साहित्याची ओळख, स्पर्धा परिक्षा,21 दिव्यांग प्रकार व अध्ययन शैली,शालेय पोषण अभिलेखे,प्रशासकीय माहिती इत्यादी विषयांवर सहशिक्षिका दिलशाद शेख, सहशिक्षक मानकर, सहशिक्षिका निरंजना पाटील , दिव्यांग विषय तज्ञ मनिषा गायकवाड, सहशिक्षक रविंद्र पोटे,केंद्रप्रमुख शामराव पवार यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले.
यावेळी जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख नरेश भोईर, प्रभारी केंद्रप्रमुख शामराव पवार, मनिषा गायकवाड, शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा साक्षी पांडव,उपाध्यक्षा नाजमिन शेख,सदस्या नंदिनी घरत,शिल्पा हरड,गीता फापे,पूनम घोडविंदे,कृष्णा पांडव,एकनाथ घरत ,शिक्षक, शिक्षिका,मुख्याध्यापक उपस्थित होते.