बदलापूर मध्ये पुर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता,, पोलिस आणि पालिका प्रशासन सज्ज
सहाय्यक संपादक रुतिकेश रोकडे यांचा खास रिपोर्ट

कुळगाव बदलापुर ऊल्हास नदिने धोक्याची पातळी ओलांडली असून बदलापुर शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा बदलापुर पालिका प्रशासनाने दिला आहे, मागील तीन ते चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत,
बदलापुर पश्चिम हा सकल भाग असल्याने ऊल्हास नदिची पातळी वाढल्यास,नदिच्या जवळच असलेल्या रमेश वाडी,हेंद्रेपाडा मांजर्ली,सोनीवली,वालीवली या परिसरात झपाट्याने पाणी भरत असते,असाच प्रकार बदलापुर पश्चिम परिसरात अनेक वेळा होऊन पुर परिस्थिती निर्माण झाली होती, या मध्ये सन २००५ पासून त आज पर्यंत अनेक वेळा पुर येऊन, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, काही वेळा जिवितहानी देखील झाली असल्याचे बघायला मिळाले आहे,सुरु असलेला पाऊस हा काही काळ असाच पडत राहिल्यास नागरिकांना पुन्हा एकदा पुर परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे,
या बाबत कुळगाव बदलापुर नगरपालिका प्रशासनाने कमालीची दक्षता घेतलेली असुन पुर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे,ऊल्हासनदीच्या दोन्ही बाजूंनी पालिका प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले असून, दोन्ही प्रशासन पुर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, सकाळी ९ वाजल्यापासून पाण्याची पातळी १६,५ मिटर पेक्षा वर गेलेली असुन नागरिकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे दोन्ही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे,