राज्यस्थान मधिल आठ वर्षीय दलित विद्यार्थ्यी ईंद्र मेघवाल याच्या हत्येचा विरोधात भोपाळ मध्ये निषेध आंदोलन,,

भोपाळ! दिनांक १९/८/२०२२ रोजी राज्यस्थान मधिल जालोर मध्ये तिसरी मध्ये शिकत असलेला आठ वर्षांचा विद्यार्थी इंद्रकुमार मेघवाल याने शिक्षकांच्या मठक्यातुन पाणी पिले म्हणून त्याला या जातीयवादी शिक्षकाने बेदम मारहाण केली त्यात इंद्रकुमार मेघवाल हा गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला, या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे, देशभरात या घटनेचा निषेध करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे,
याच पार्श्वभूमीवर राजधानी भोपाळ मध्ये आंबेडकर संघटना, दलित आदिवासी वंचित फोरमचे चेअरमन तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव डॉ मोहनलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले, या वेळी आरक्षित वर्गाला वेळेत न्याय द्यावा अन्यथा मोठ्या प्रमाणात जाती व्यवस्थे विरोधात तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा मोहनलाल पाटील यांनी राज्यस्थान सरकारला दिला असुन,अपराधींना खुलेआम फाशी देण्याची मागणी देखील या वेळी करण्यात आली, या वेळी जाती प्रमाण संखर्ष समितीचे संयोजक जयेश जाधव, श्री मिलिंद बौद्ध, रामदास घोषले,प्रकाश सोनवणे, दलित बन्सोड,हरिश लोनारे,कुवरलाल रामटेके,प्रकाश रणवीर, राहुल बाविस्कर, मिलिंद सरदार, राहुल मेश्राम, ऊमेश नारनवरे, यांच्यासह महिला आघाडीच्या ईंदु पाटील,रजनी नगरारे, संघमित्रा गजभिये, कल्पना पाटील,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,