नाशिक मधिल अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या,, युवानेते बिपिन कटारे यांची मागणी

नाशिक मध्ये एका ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर ५६ वर्षीय ईसमाने केलेल्या बलात्कार प्रकरणी नाशिक शहरा मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेत आहे, नाशिक मधिल आंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदरची घटना घडली आहे, या बाबत मिळालेल्या माहितीनुसार पिढित मुलीची आई आंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चहाची टपरी चालवत असुन ज्ञानेश्वर त्र्यंबक पाटील ५६ वर्षीय ईसम चहा पिण्याच्या बहाण्याने सदर टपरीवर येऊन तासनतास बसून विडी सिगारेट ओढत असे, सदरच्या इसमाच्या सतत येण्याणे त्याचे पिढित मुलीची आई व पिढित मुलगी यांच्या बरोबर ओळख वाढत गेली, आणि पहिल्या पासूनच या ९ वर्षीय मुलीवर वाईट नजर ठेवून असलेल्या या नराधमांने मुलिच्या आईला विश्वासत घेऊन मुलीला बाहेर फिरायला घेऊन जाण्यास सुरुवात केली,अशाच प्रकारे ५ आणि ६ ऑगस्ट २०२२ रोजी या इसमाने मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने तिच्यावर अमानुष बलात्कार केला आणि सदरची बाब तिच्या आईला सांगु नये म्हणून मुलीला मारण्याची धमकी दिली होती, परंतु दिनांक ८ ऑगस्ट रोजी मुलीच्या पोटात जास्त प्रमाणात दुखु लागल्याने मुलिच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला, झाल्या प्रकाराने आईच्या पायाखालची वाळू सरकली,त्या नंतर मुलीच्या आईने तात्काळ आंबड पोलिस ठाणे गाठत तेथील वरीष्ठ पोलिस अधिकारी यांना सदरचा प्रकार कथन केला,प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने मुलीला औषध उपचारासाठी पाठवुन डॉक्टरांनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारे या नराधमाला बेड्या ठोकल्या,सदर मुलगी ही अल्पवयीन आणि मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी सदरच्या ईसमावर पोक्सा कायद्याअंतर्गत ॶॅट्रॉसिटीॶॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे,