देशातील मागासवर्गीय आमदार खासदार राजीनामा देतील काय?
पाण्या साठी आजही जीव गमवावा लागतोय.:- डॉ. माकणीकर

*मुंबई दि (प्रतिनिधी) आज भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष लोटली तरी पिण्याच्या पाण्यासाठी भारताच्या भविष्य काळाला आपला जीव गमवावा लागतो. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ मागासवर्गीय आमदार खासदार आपला राजीनामा देऊन जाईवाड संपवण्या साठी एक पाऊल् का उचलत् नाहीत.*
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी असा प्रश्न उपस्तिथ केला असून सर्व मागासवर्गीय आमदार खासदारांना आपण याकरिता पक्षाच्या वतीने पत्र पाठवून जवाब विचारनार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात जातीवाद फोफावत असून गोर गरीब दलित बौद्ध व आंबेडकरी जनतेला संवर्णं जातीच्या लोकाकडून टार्गेट केल जात आहे. हा प्रकार अशोभनीय असून समाजात अशी दुही निर्माण करून संविधांनाच्या मूलभूत हक्क व अधिकारांची पायमल्ली केली जात आहे. असाही आरोप विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी केला.
मानवीय नीतिमुल्ले रोज पायदळी तुडवले जात आहेत, मुस्लिम बौद्ध तर दलितांवर भ्याड हल्ले करून जीवन संपवले जात आहे, अस असतांना देशातील मागासवर्गीय आमदार खासदार मूग गिळून गप्प आहेत. यापुढे असे प्रकार घडले तर देशातील एकाही मागासवर्गीय आमदार खासदाराला देशात फिरू दिले जाणार नाही असाही इशारा यावेळी डॉ. राजन माकणीकर यांनी दिला.