आपला जिल्हा

बदलापूर !! भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी बदलापुर पोलिस अधिका-यांना संविधान पुस्तिकांची भेट

बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रोहित लोंढे यांच्या संकल्पनेतून बदलापुर पुर्व पश्चिम पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान पुस्तिकांची भेट देण्यात आली,


बदलापुर शहरा मध्ये ठिक ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याला ७५वर्षे पुर्ण होत असताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट रोजी साजरा होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस कडून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे विषेश कौतुक होत आहे, भारतीय स्वातंत्र्या मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील फार मोठे योगदान आहे,याचीच आठवण म्हणून रोहित लोंढे यांनी सदचा ऊपक्रम राबवला असल्याचे समजते,

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बदलापुर शहर अध्यक्ष श्री आशिष दामले सामाजिक न्याय विभागाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आल्याचे रोहित लोंढे यांनी सांगितले , देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी देश सेवेसाठी तत्पर असलेल्या पोलिसांचा देखील या निमित्ताने सन्मान होणे गरजेचे असल्या कारणाने बदलापुर पुर्व व पश्चिम पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना तसेच पोलिस चौकी मध्ये कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी अधिकारी, ट्रॅफिक पोलिस त्याच प्रमाणे पोलिस पाटील यांचा यथोचित सन्मान संविधानाची पुस्तिका भेट देऊन सर्वच पोलीस अधिकारी कर्मचारी यांना स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आल्या, या वेळी बदलापुर शहर डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष सुमित सुखदेव,वार्ड क्रमांक १३ चे अध्यक्ष रितेश बच्छाव आणि पंचरत्न मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.