ठाणे श्रीनगर पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता भीमराव वाव्हळ यांची गळफास लावून आत्महत्या,,

ठाणे प्रतिनिधी!!- श्रीनगर पोलीस स्टेशन (ठाणे पोलीस आयुक्तालय) निवडणुकी वरील महिला पोलीस नाईक अनिता भीमराव वाव्हळ (७५७६) या मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी साडेदहा वाजता नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाल्या होत्या
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार त्यांना फोन वरून संपर्क करत असताना.सदर महिला पोलिस फोन उचलत नसल्याने.त्यांनी
महिला कक्षात जाऊन प्रत्यक्ष पाहिले असता, महिला पोलीस नाईक अनिता वावळ यांनी ओढणीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.
श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी प्रेस नोट मध्ये घरगुती कारणास्तव आत्महत्या केल्याचे दिसून येत आहे .असे म्हटले आहे . घरगुती भांडणातून आत्महत्या केली ही बाब तात्काळ वरिष्ठांना कशी समजली ? या बाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . त्यामुळे ही आत्महत्या संशयास्पद आहे. बातमीला कोणताही दुजोरा न देताच श्रीनगर पोलीस ठाणेच्या अधिकाऱ्यांनीआपली बाजू झटकण्याचा प्रयत्न केला आहे अशी चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे,
या दुर्दैवी घटनेची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. जगजित सिंग यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, तसेच अप्पर पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे,