
नाशिक-: येवला तालुक्यात अवैध व्यवसाय विरोधी मोहीमे दरम्यान येवला तालुका पोलिसांनी गुरुवारी(दिनाक. ७ रोजी दमदार अशी कामगिरी केली असून आरोपींकडून १.६६ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सापळा रचत स्कुटी एमएच १५ – जेजे ३२९४ फरहान बिलाल शेख (वय २६, रा. परदेशपुरा), समिर शकिल शेख (वय २१, रा. कचेरी रोड, येवला) यांना ताब्यात घेतले. आरोपी विरोधात येवला तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४७८ / २०२३ भादविक ३२८, २७२, २७३, १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येवला तालुका पोलीस निरीक्षक श्री पांडुरंग पवार यांचे अधिपत्याखालील अंदरसूल दूरक्षेत्रात अज्ञात इसम गुटखा विक्रीकरिता येत असलेबाबत गुप्त माहिती मिळाली. सहाय्यक पोलिस निीक्षक भास्कर शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंडागळे, पोलिस हवालदार दौलत ठोंबरे, पोलिस.नाईक. राजेंद्र बिन्नर, पोलिस शिपाई. आबा पिसाळ, पोलिस गणेश बागुल यांच्या टीमने धामणगाव शिवारात येवला भारम रोडने संशयित वाहनाचा पाठलाग केला व मोहीम फत्ते केली. येवला पोलिसांचे पकीसरात सर्वत्र कौतुक होत आहे.