दि ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत कु. सृष्टी प्रवीण कांबळे व रितिका सुहास भोसले यांची उल्लेखनीय कामगिरी

स्वाभिमान भारत कप 16 व्या आय. आय. के. एफ. दि ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेमध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव श्री प्रवीण कांबळे यांची कन्या कुमारी सृष्टी प्रवीण कांबळे हिने उल्लेखनीय कामगिरी करत 13 वर्षावरील गटात काता प्रकारामध्ये सिल्वर मेडल मिळवले तसेच डॉक्टर सुहास भोसले यांची कन्या रितिका भोसले हिने काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये सिल्वर मेडल मिळवले आहे,
या स्पर्धेत एकूण 886 स्पर्धक सहभागी झाले होते महाराष्ट्र, गोवा, पंजाब, तामिळनाडू, बिहार, तेलंगाना, ओडिसा , पश्चिम बंगाल आदी राज्यांमधून स्पर्धक स्वाभिमान भारत कप 16व्या आय आय के एफ दि ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप 2022 मध्ये सहभागी झाले होते. सृष्टी प्रवीण कांबळे व रितिका भोसले यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कास्ट्राईब शिक्षक संघटना सर्व पदाधिकारी तसेच सिद्धार्थ फाउंडेशन वासिंद, धम्म सृष्टी फाउंडेशन कल्याण यांच्यावतीने अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या तसेच समाजातील अनेक हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.