ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून नूतन करवीर गटविकास अधिकारी यांचा सत्कार

*डॉ. सुरेश राठोड*
कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेकडून नुकतेच गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या ठिकाणी रुजू झालेले नूतन गटविकास अधिकारी व्ही व्ही. यादव यांचा सत्कार करण्यात आला.
करवीर ग्रामपंचायत कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांनी करवीर पंचायत समिती येथे एकत्रित येऊन, कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या वर चर्चा केली. याबरोबर ज्येष्ठ कर्मचारी यांचाही विचार करणे गरजेचे आहे. हद्द वाढ झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे काय होणार अशा प्रकारच्या अनेक प्रश्न एकत्रित उपस्थित करण्यात आले. यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन ज्येष्ठ कर्मचारी वाडीपिर ग्रामपंचायतचे शिपाई सर्जेराव शेळके व सुभाष पाटील या दोन कर्मचाऱ्यांच्या हस्ते नूतन गटविकास अधिकारी व्ही व्ही यादव यांचा व नूतन ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गीतांजली वाईंगडे यांचाही पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.