ताज्या घडामोडी

बदलापुर, अंबरनाथ, उल्हासनगर व परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार

डॉ. बी.जी. छाया रुग्णायात मिळणार अद्ययावत उपचार

अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर तसेच लगतच्या परिसरातील रुग्णांकरीता आरोग्य सेवा पुरविणारे कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालय तसेच उल्हासनगर -३ येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालय, उल्हासनगर -४ येथील शासकीय प्रसूती दवाखाना यामधील आरोग्य विषयक समस्यां संदर्भात आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या शासन स्तरावरील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बुधवारी राज्याचे आरोग्य मंत्री ना.श्री.तानाजीराव सावंत यांच्या मंत्रालयीन दालनात बैठक पार पडली.या बैठकीत या रुग्णालयातील आरोग्य विषयक सुविधांवर सविस्तर सकारात्मक चर्चा पार पाडत अंबरनाथ व उल्हासनगर शहरवाशियांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही यावेळी आरोग्यमंत्री ना. तानाजीराव सावंत यांनी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांना दिली.

या बैठकी दरम्यान अंबरनाथ येथील कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेले शासकीय निवासस्थानाची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने अंबरनाथ नगरपरिषदेमार्फत धोकादायक घोषित करण्यात आली असून ही इमारत तातडीने पाडण्याच्या सूचना मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांना देत त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून १०० बेड करीता इमारतीचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर करण्याच्या सूचना आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार यांना दिल्या.
तसेच उल्हासनगर – ३ येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालय १०० बेडवरून २०० बेडचे करण्याबाबतचा प्रस्ताव ही आरोग्य सेवा मंडळाच्या उप संचालका मार्फत शासनास सादर करण्यात आले असून त्याबाबत तसेच या रुग्णालयातील उदवाहक ( लिफ्ट) बदलण्याबाबत ही तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना याप्रसंगी आरोग्य मंत्री ना.सावंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

उल्हासनगर – ४ येथील शासकीय प्रसूती दवाखान्यात ही आरोग्य विषयक सुविधांवर भर देऊन रुग्णालयातील आवश्यक कर्मचारी व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना आरोग्य मंत्री ना.सावंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

याबैठकिला माजी नगराध्यक्ष श्री.सुनिल चौधरी, उप शहरप्रमुख श्री. पुरुषोत्तम उगले, आरोग्य सेवा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे, आरोग्य विभागाचे सह सचिव श्री.दिलीप गावडे, संचालक डॉ.साधना तायडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलाश पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.हरेश पाटोळे, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ तसेच संबधित अधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.