एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे उपक्रमांतर्गत सभा संपन्न
दि.बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक-डाॅ.बी.आर.आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष आयु.राजरत्न अशोकराव आंबेडकर

एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे या उपक्रमा अंतर्गत डाॅ.बी.आर.आंबेडकर मागासवर्गीय सहकारी पतसंस्था (बुद्धीस्ट बॅन्क)चे भागधारक (शेअर होल्डर)होणे बाबतची सभा सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेचे वतीने संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड सर यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी सिद्धार्थ फाऊंडेशन कार्यालय (रत्नपंकजा निवास श्रीराम नगर वासिंद पश्चिम) येथे सायंकाळी ठीक 6-00 वाजता संपन्न झाली
सभेची सुरूवात महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून बुद्धवंदनेने करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.
या सभेत दि. बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष मा. राजू चन्ने,शाहापूर, मुरबाड तालुका विभागीय अध्यक्ष मा.किरण थोरात,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मा.गुरुनाथ गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.बुधाजी वाढविंदे इत्यादीने *एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे* या विषयावर मार्गदर्शन केले.
*सदर सभेत जे बुद्धीस्ट बंधू,भगिनी डाॅ.बी.आर. आंबेडकर मागासवर्गीय पतसंस्थेचे ( बुद्धीस्ट बॅन्क) 25 भागधारक झाले त्यांचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान सत्कार करण्यात आला*. *तसेच अॅ ड.प्रतिभा कांबळे मॅडम यांना अनुताई वाघ समाज रत्न राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेचे वतीने गुलाबपुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
*सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संस्थेचे सरचिटणीस जगदिश गायकवाड सर यांनी केले*
सदर सभेला सिद्धार्थ फाऊंडेशन वासिंद संस्थेचे अध्यक्ष अशोक गायकवाड सर, सरचिटणीस जगदिश गायकवाड सर, कोषाध्यक्ष डाॅ.होमराज शेंडे,माजी.अध्यक्ष वसंत धनगर सर,संचालक शिवराम चन्ने, मच्छिंद्र सालवे, संजीव जाधव सर,गुरूनाथ गायकवाड सर,जितेंद्र खरे सर, रत्नदीप शिवगण, संदीप गायकवाड, दि.बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष बुधाजी वाढविंदे, विभागीय अध्यक्ष किरण थोरात, विभागीय अध्यक्ष मधुकर सालवे,विभागीय अध्यक्ष गणेश गायकवाड, तालुका अध्यक्ष राजू चन्ने व वासिंद विभागातील बुद्धीस्ट धम्म बंधू भगिनी उपस्थित होते.