महाराष्ट्र

फॅक्चर्ड फ्रीडम ‘ चा रद्द केलेला पुरस्कार सन्मानाने परत करा.

डोंबिवलीतील विविध पुरोगामी संघटनांची मागणी

विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करून, अघोषित आणीबाणी लादणाऱ्या फॅसिस्ट सरकारचा जाहिर निषेध करित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाचा रद्द केलेला पुरस्कार सन्मानाने परत करा अशी आग्रहाची मागणी डोंबिवलीतील अनेक पुरोगामी विचारांच्या संघटनांनी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात करण्यात आली.
डोंबिवली ( पूर्व )स्टेशन जवळील इंदिरा गांधी चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या या धरणे आंदोलानाला डोंबिवतील जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.


कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाच्या अनघा लेले यांनी अनुवादित केलेल्या मराठी पुस्तकाला साहित्य क्षेत्रातील तज्ञ समितीने ‘तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी’ हा एक लाखाचा पुरस्कार घोषित केला.
या पुस्तकाला घोषित झालेला पुरस्कार कुठलेही सबळ कारण न देता, तज्ञ समितीचा निर्णय डावलून महाराष्ट्र शासनाने अतिशय अपमानास्पद पद्धतीने रद्द केला. याबाबत संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेत संतापाची लाट उसळली. साहित्य क्षेत्रातील अनेकांनी सरकारच्या या मुस्कटदाबी विरोधात रोष व्यक्त करीत आपल्या विविध शासकीय समित्यातील पदांचे राजीनामे दिलेत.

सध्या देशात फॅसिस्ट प्रवृत्तीने थैमान घातलेले आहे. महागाई, बेरोजगारी, लोकांच्या दैनंदिन जीवनाचे प्रश्न चरम सीमेला पोहोचलेले आहेत.
लोकशाहीचा मुख्य स्तंभ मानल्या गेलेल्या प्रसार माध्यमावर पूर्ण ताबा मिळवून संपूर्ण लोकशाही धोक्यात आणल्या जात आहे.


घोषित केलेला पुरस्कार अपमानास्पद पद्धतीने काढून घेणे ही विचार स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होय असे मत सगळ्याच पुरोगामी विचारांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले .

कोबाड गांधी हे पुरोगामी, कम्युनिस्ट विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी कामगार, शेतकरी, दलित यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर लढा दिला .या कालावधीतील त्यांना दहा वर्षे तुरुंगात काढावी लागली. तुरूंगातील अनुभव, स्वतःच्या आयुष्यातील जनचळवळींचे अनुभव यावर आधारित *आत्मकथन* म्हणजे श्री कोबाड गांधी यांचे *फ्रँक्चर्ड फ्रिडम* हे पुस्तक होय.
कोबाड गांधी यांनी लिहिलेल्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ पुस्तकावर बंदी नसतांना, कुठलेही आक्षेप नसतांना, अनघा लेले यांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकाला दिलेला पुरस्कार, महाराष्ट्र शासनाने रद्द करणे हे निषेधार्य आहे. फँसिस्ट हुकुमशाहीने मूळ पुस्तक, अनुवादीत पुस्तक त्यांचे लेखक-अनुवादक त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची केलेली ही गळचेपी होय असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी व्यक्त केले.
लोकशाहीच्या बुरख्याआड असलेल्या फँसिस्ट हुकूमशाहीचा कामगार, शेतकरी, श्रमिक, शिक्षक, या सर्वांनी एकजुट होवून प्रचंड ताकदीने विरोध केला पाहिजे अशा तीव्र भावना कष्टकरी हॉकर्स युनियनचे कॉम्रेड बबन कांबळे, सिपिआय रेड स्टार चे समीर साने, रामदास वायंगडे, राष्ट्रसेवा दलाचे जिवराज सावंत आदी प्रतिनिधींनी व्यक्त केले.


या धरणे आंदोलनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विश्वस्त श्री गणेश चिंचोले, राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रविण देशमुख
सि.पि.आय. काॅम्रेड संकल्पना,
काळु कोमास्कर ,पद्माकर पाटील, रामदास वायंगडे, जालिंदर , विलास शेळके,सुब्रमण्यम
राष्ट्र सेवा दलाचे जीवराज सावंत
श्रमिक मुक्ती दलाचे ज्ञानेश पाटील
AIRSO- चे अक्षय, ओंकार, विनायक ,आयटकचे काॅम्रेड उदय चौधरी ,कष्टकरी हाॅकर्स युनियनचे
काॅम्रेड बबन कांबळे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती डोंबिवली शाखेचे श्री उदय देशमुख,सि.पि.आय ( एम.एल)रेड स्टार चे
प्रमोद तावडे, काॅम्रेड अरुण वेळासकर इत्यादी वक्तांनी सरकारच्या मुस्कटदाबी विरोधात आपले विचार व्यक्त करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
पुरस्कार सन्मानाने परत केला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या सर्व प्रतिनिधींनी दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.