भालोद ता.यावल जि. जळगाव येथील बौध्द वस्तीवर बजरंग दलाच्या गुंडांचा भ्याड हल्ला

भालोद ता. यावल येथील महाविद्यालयात हिंगोणा येथील बौद्ध तरुणासोबत झालेल्या वादाचा राग म्हणून सावदा, कोचूर, न्हावी, फैजपूर, चिनावल येथील बजरंग दलाच्या गुंडांनी थेट भालोद येथील बौद्ध वस्तीवर लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड, फायटर व सोबतच दगडफेक करत ६०/७० गुंडाणी अचानकपणे भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात रोहित लोखंडे व आशुतोष भालेराव हे दोन तरुण गंभीर जखमी झालेत. आशुतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्याला 9 ते 10 टाके लावण्यात आले असून, रोहित याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
“तुम्ही महारडे खूप माजलेत, तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय बजरंग दल शांत बसणार नाही, आमचे कोणी काही करु शकात नाही, आम्ही तुमची वस्ती पेटवून टाकू..!” अशी धमकी देत लाठ्याकाठ्या व विविध शस्त्रासोबत थेट वस्तीवर हल्ला चढवला. यात बजरंग दलाच्या गुंडांनी वस्तीतील तारुणांसोबत महिलांवरही तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत असंख्य महिलांनाही दुखापत झाली असून सादर हल्ल्या प्रकरणी गावातील तमाम बौद्ध बांधवांसोबत ऑल इंडिया पँथर सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष शैलेश मेढे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष निलेश पवार यांच्या सोबत विविध आंबेडकरी पक्ष व संघटनेचे कार्यकर्ते संबंधित गुंडांवर गुन्हा दाखल करण्यासाठी फैजपूर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले असून सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे….