कुळवाडीभूषण, छत्रपती शिवाजीमहाराज जयंती निमित्त शिवाजी कोण होता? पुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाटप

कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक, महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज जयंती आयोजन जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा केंद्र कोशिंबी,भिवंडी येथे 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता करण्यात आले.
*प्रथम बहुजन प्रतिपालक, छत्रपती शिवाजीमहाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे यांचे हस्ते अर्पण करून ग्रामस्थ सुनिताताई यांनी दीपप्रज्वलन केले*
तसेच सर्व विद्यार्थ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
*”जयजय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा”हे राज्यगीत सहशिक्षक अशोक गायकवाड व विद्यार्थांनी गायन केले*
छत्रपती शिवाजी महाराजांचा -विजय असो असा जयघोष करण्यात आला.
*”राजमाता जिजाऊने शिवबा घडवला”.* या विषयावर सहशिक्षक अशोक गायकवाड सर यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.
अॅड . अंकित जाधव (डोहोळे )यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना व माजी विद्यार्थ्यांना *शिवाजी कोण होता?* हे पुस्तक भेट दिले.त्याचे वाटप करण्यात आले.
*दोनच राजे इथे गाजले कोकण पूण्य भूमीवर* या गीतावर चौथीच्या विद्यार्थीनीनी नृत्य सादर केले.
*माजी विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य सादर केले*
माजी उपसरपंच ज्ञानेश्वर ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना डेअरी मिल्क चाॅकलेट व सुनिता ताईंनी राजगीरी लाडू देऊन विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी बहारदार शैलीत केले.
सदर जयंती कार्यक्रमास शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे,अॅड. अंकित जाधव, सुनिताताई,मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, विद्यार्थी,माजी विद्यार्थी ,पालक उपस्थित होते.