राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे दिनांक २५/२६ फेब्रुवारी २०२३ रोजी देणार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड बदलापुर शहराला भेट,
दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बदलापुर येथे होणार राज्य कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अण्णासाहेब कटारे हे येत्या २५ आणि २६ फेब्रुवारी २०२३ रोजी ठाणे जिल्हा दौ-यावर येणार असल्याची माहिती पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी दिली आहे, सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेऊन अण्णासाहेब कटारे यांनी महाराष्ट्र राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटी घेतल्या असून आगामी होणाऱ्या निवडणुकींच्या पाश्र्वभूमीवर ते लवकरच आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी अण्णासाहेब कटारे हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन मुरबाड विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करणार आहेत,
या वेळी पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष श्री विठ्ठल चौधरी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे सकाळी १२ वाजता अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, त्या नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाहीर सभेचे देखील आयोजन केले असल्याचे पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ऍड श्री दिनेश ठाकरे यांनी सांगितले आहे, सध्या महाराष्ट्रात राष्ट्रिय रिपब्लिकन पक्षाची एक वेगळी ताकद निर्माण झालेली असुन, जवळपास सर्वच प्रस्थापित पक्षांनी आगामी होणाऱ्या निवडणुकींच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला युती संदर्भात आमंत्रित केले असल्याने, राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून युती बाबत निर्णय घेणार असल्याचे युवा आघाडीचे नेते बिपिन कटारे यांनी म्हटले आहे,
याच पार्श्वभूमीवर अण्णासाहेब कटारे दिनांक २६ फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील बदलापुर शहराला देखील भेट देणार असुन सकाळी १२ वाजता बदलापुर गाव जांभळा जोड येथील सुभद्रा निवास या ठिकाणी राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे, पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांनी सदरच्या बैठकीचे आयोजन केले असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, या वेळी आगामी होणाऱ्या निवडणुकीं बाबत कोणत्या पक्षा बरोबर युती करायची किंवा कसे या बाबत महत्वपूर्ण चर्चा होणार असुन कदाचित या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे,