बदलापूर वंचित बहुजन आघाडीचे नेते श्री दत्ता गायकवाड यांना पितृ शोक

बदलापूर! वंचित बहुजन आघाडीचे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष श्री दत्ता गायकवाड यांचे वडील बारकु कुशा गायकवाड यांचे दिनांक २५ संप्टेंबर २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, दिवंगत बारकु कुशा गायकवाड हे रायगड जिल्ह्यातील माणगाव या गावचे मुळ रहिवासी तसेच शेतकरी हा त्यांचा मुळ व्यवसाय होता,बारकु कुशा गायकवाड यांचा सामाजिक,धार्मिक क्षेत्रात देखील मोलाच सहभाग होता, या मुळे त्यांच्या जाण्याने समाजामध्ये शोककळा पसरली आहे, त्यांच्या मागे पत्नी निर्मला, मुलगा संदीप, दत्ता, मुलगी कविता मोरे, सुनीता अभंग आणि नातवंडे असा परिवार आहे, पैकी मुलगा दत्ता गायकवाड हे वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष असुन सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे, दिवंगत बारकु कुशा गायकवाड यांचा जलदान विधी व शोकसभेचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक ७ आक्टोंबर २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता माणगाव येथे होणार असल्याची माहिती दत्ता गायकवाड यांनी दिली आहे