आरोग्य व शिक्षण

जिल्हापरिषद डोहोळेपाडा शाळेच्या संरक्षण भिंतीचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा ता.भिवंडी येथे दि.1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी संरक्षण भिंत उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
प्रथम जिल्हापरिषद ठाणे बांधकाम व आरोग्य माजी सभापती तथा शिक्षण समिती सदस्या वैशालीताई चंदे ,डोहोळे ग्रामपंचायत सरपंच छाया हरड,सदस्य विजय हरड यांचे सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
ठाणे जिल्हापरिषद बांधकाम व आरोग्य माजी सभापती तथा ठाणे जिल्हापरिषद शिक्षण समिती सदस्या वैशालीताई चंदे मॅडम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून संरक्षण भिंत भूमीपूजन केले.
तसेच या वेळी त्यानी सांगितले की,सदर संरक्षण भिंत ही जिल्हापरिषद षेस फंडातून मंजूर झाली असून 5 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.तसेच जिल्हापरिषद शाळा डोहोळे पाडा शाळेची एक वर्गखोली धोकादायक असून तिथे जी पल्स वन (G+1) वर्ग खोली मंजूर झाली असून तिचे सुद्धा लवकरच बांधकाम सुरू होईल.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले तसेच शाळेला भौतिक सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल आभार मानले.


या वेळी ठाणे जिल्हापरिषद बांधकाम व आरोग्य माजी सभापती तथा शिक्षण समिती सदस्या वैशालीताई चन्दे,ग्रामपंचायत सरपंच छाया हरड,सदस्य विजय हरड,निलेश घोडविंदे,ग्रामपंचायत क्लार्क एकनाथ जाधव, ग्रामस्थ योगेश कथोरे,मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.