ज्ञानगंगोत्री संस्थेच्या २३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारती विद्यापीठ( पुणे)पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी (p,s,I) अंकुजी कर्चे यांची प्रमुख उपस्थिती,
प्रतिनिधी पुणे! स्नेहा उत्तम मडावी

पुणे! ज्ञानगंगोत्री संसंस्थे ची स्थापना सन 5 जानेवारी 2001 रोजी करण्यात आली आहे,.हि संस्था अनाथ व एक पालक असणाऱ्या दिव्यांग मुलांना मोफत निवासी सेवा व शिक्षण देण्याचे कार्य करत असते. त्याच बरोबर दिव्यांग मुलांना कपडे , औषधे , मुलांची मोफत शैक्षणिक सहल त्याच बरोबर 50 (पन्नास ) दिव्यांग मुलांना खऱ्या अर्थाने पालकत्व देण्याचं कार्य सातत्याने करत असते
. त्याच बरोबर इतर गरजू संस्थांना ही मदत करण्यासाठी ही संस्था नेहमीच कार्यशील असते. अशा या गेली 23 वर्ष सामाजिक बांधिलकी जपण्याच कार्य करीत असणाऱ्या संस्थेला 23 व्या वर्धापन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे म्हणून ,पी. एस. आय (p s i )माननीय श्री अंकुश जी कर्चे साहेब यांनी या संस्थेचे कामाचे कौतुक केले सर्व मतिमंद मुलांचे आभार मानले या संस्थेला कही मदत लागली तर सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, त्याच बरोबर संस्थापक /अध्यक्ष विक्रम कसबे सर, संचालक किशोर भाऊ रायकर, बांधकाम व्यावसायिक श्रीकांत भाऊ लिपणे,तसेच कार्यक्रमात उपस्थित सर्व शिक्षक व कर्मचारी यांचे आभार मानले,तर,,