महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा देशातील प्रत्येक नागरिकाने निषेध नोंदवलाच पाहिजे,,.

मोठ्या संख्येने सामिल व्हा
आज दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा अवमान करणारे भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निषेध रॅलीचे आयोजन ,,, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सातत्याने महापुरुषांचा अवमान करण्याची मालिका सरकार मधिल लोकप्रतिनिधी यांनी सुरू केलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशावर केलेले अनंत उपकार हे कधीच फिटण्यासारखे नाहीत याच महापुरुषांचा आदर्श समोर ठेवुन या देशाची आणि राज्याची वाटचाल सुरू आहे,कींबहुना देशाची वाटचाल योग्य दिशेने जाण्यासाठी त्यांचाच आधार घेतल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही, फक्त भारत देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वाला वंदनिय असलेल्या या महापुरुषांचा अवमान सातत्याने सरकार मधिल लोकप्रतिनिधी करत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी आधी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले व त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान करुन अवघ्या महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली आणि नुकतेच भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लोकांकडून भिक मागुन शाळा सुरू केल्या असे वक्तव्य केल्याने राज्यासह देशामध्ये संतापाची लाट उसळली आहे, अशा बेताल, बेलगाम नेत्यांचा करु तेव्हढा निषेध हा कमीच आहे, देशातील प्रत्येक नागरिकाने या बाबत निषेध नोंदवणे गरजेचे आहे तरच भविष्यात अशा प्रकारे महापुरुषांचा अवमान करण्याच धाडस कोणी कधीच करणार नाही याच अनुषंगाने आज दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजता बदलापुर शहरातील सर्व आंबेडकरी अनुयायी सामाजिक राजकीय संस्था संघटनांनी एकत्र येऊन निषेध रॅली काढण्याचे आयोजन केले आहे,सदरची रॅली सायंकाळी पाच वाजता बदलापुर पश्चिम रमेशवाडी येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्या पासून सुरू होणार असून बदलापुर पश्चिम बसडोपो येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ समारोप करणार आहे, या मध्ये संपूर्णपणे कायद्याचे पालन करुन लोकशाही मार्गाने सदरची निषेध रॅली काढण्यात येणार असून,,आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात मोठ्या ताकदीने या मध्ये आपला सहभाग नोंदवलाच पाहिजे,