नाशिक जिल्ह्यात शेतकरी आक्रमक,विविध ठिकाणी आंदोलन ,चांदवडला शेतकऱ्यांनी केला दोन तास रस्ता रोको. महामार्गावर वाहनांच्या रांगात रांगा,,
नाशिक-: शांताराम दुनबळे

नाशिक-: शासनाने कांद्यावर 40% निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून कांदा निर्यातीचे चुकीचे धोरण, पावसाची कमतरता, औषधांची व खतांची भरम साठ दरवाढ या सर्व कारणांनी शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून सदरचा निर्णय शेतकऱ्यांसाठी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
त्यातच सरकारने दोन लाख मॅट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रमाणे खरेदी करण्याची घोषित करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचे काम केले आहे. यापूर्वी नाफेडणे तीन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी केला त्यात किती शेतकऱ्यांना याचा फायदा झाला?? हा संशोधनाचा विषय आहे यात सरसकट मार्केटमध्ये आलेल्या किती शेतकऱ्यांचा कांदा नाफेडने खरेदी केला ?
400 ते 500 ट्रॅक्टर लिलाव साठी आलेले असताना दोन ते तीन शेतकऱ्यांचा कांदा नाफेडणे खरेदी करायचा व बाकीच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचे धोरण नाफेड राबवते. सदरच्या मोर्चाप्रसंगी माजी आमदार शिरीष कोतवाल व प्रहार चे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार केला.
कांदा निर्यात शुल्क 40 टक्के रद्द करण्यासाठी आज सर्व पक्षीय नेत्यांनी शेतकरी कृती समितीच्या नावाने कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी एकत्र येऊन मोर्चाने मुंबई आग्रा हायवे व रस्ता रोको करून नॅशनल हायवे दोन तासांपेक्षा जास्त काळ अडवून सदरच्या कांदा प्रश्न केंद्र शासनाला व महाराष्ट्र शासनाला समजण्यासाठी निफाड येवला सटाणा लालसगाव येथे ही निषेध व्यक्त केला.
या ठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधातील आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. तालुक्यातील जनतेकडून शेतकऱ्यांकडून सदरच्या आंदोलनात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दोन तासांच्या रस्ता रोको नंतर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले यावेळी
चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीष कोतवाल, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन दादा आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर साहेबराव गायकवाड, प्रहार चे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, मार्केट कमिटीचे चेअरमन संजय जाधव, काँग्रेस किसान सभा अध्यक्ष संपतराव वक्ते, विजय जाधव भीमराव जेजुरे, विलास भवर,प्रकाश शेळके, यांचे सह प्रचंड मोठ्या प्रमाणात चांदवड तालुका, देवळा तालुका, कळवण तालुका व सटाणा तालुका येथील शेतकरी वर्ग उपस्थित होता.
सदरच्या आंदोलनानंतर प्रहार चे जिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर यांना कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन थोड्या वेळानंतर सोडून दिले.
सदर आंदोलनाच्या वेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता मनमाड उपविभागीय कार्यालयाचे डीवायएसपी साहिल शेख चांदवडच्या प्रभारी डीवायएसपी सविता गर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पीएसआय सुरेश चौधरी यांनी परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी योग्य बंदोबस्त ठेवला.