आपला जिल्हा

पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गाडे यांची सामाजिक बांधिलकी लक्षवेधी

पोलीस खात्यातील प्रत्येक व्यक्ती गाडे यांच्यासारखा असणे गरजेचे: पी.आर.पाटील*

डॉ सुरेश राठोड
कोल्हापूर प्रतिनिधी:
राज्य राखीव पोलीस दलातील उप पोलीस निरीक्षक प्रकाश गाडे मूळ पुरंदर गावचे रहिवासी यांनी भाऊबीज निमित्त पोलीस आणि समाज यांच्यातील असणारे खरे नाते दाखवण्याचा एक प्रयत्न केला. कोल्हापूर जिल्ह्यातील संस्था, भारत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कार्य असणाऱ्या संस्था व दलाच्या शेजारील गावांमधील अनेक स्त्रियांना एकत्रित करून भाऊबीज साजरी करत सर्वांना साडी, मिठाई व पुष्पगुच्छ अशी ओवाळणी दिली.
या कार्यक्रमाला उपस्थित असणारे अध्यक्ष डी वाय एस पी पुरुषोत्तम पाटील प्रमुख पाहुणे अवनी संस्थेच्या संचालिका अनुराधा भोसले, लोकपाल पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ सुरेश राठोड, पीएसआय साळुंखे, सौ व श्री प्रकाश गाडे, पोलीस उपनिरीक्षक मंडल आदी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्व बहिणींना साडी, मिठाई व पुष्पगुच्छ देण्यात आले.
यावेळी डॉ सुरेश राठोड म्हणाले पीएसआय प्रकाश गाडे यांचे कार्य आम्हीअनेक वर्ष पहात आहे. छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्याप्रमाणे स्त्रीचा सन्मान बहिणी प्रमाणे करण्याची विचारधारा समाजामध्ये रुजवण्याचे कार्य गाडे हे करत आहेत. यानंतर अवनीच्या संचालिका अनुराधा भोसले म्हणाल्या पीएसआय गाडे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. प्रत्येक संस्थेने असा उपक्रम राबवणे गरजेचे आहे.
यानंतर डीवायएसपी पी.आर.पाटील म्हणाले पोलीस खात्यातील प्रत्येक व्यक्ती गाडे यांच्यासारखे असणे आवश्यक आहे. आणि हाच आदर्श भविष्यात प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी गाडे यांच्याकडून घेईल. यानंतर ग्रामसेवक निलेश कुंभार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले राज्य राखीव पोलीस दलाकडून राबविण्यात येणारे उपक्रम हे समाज हितासाठी असतात. आणि अशीच पोलीस व समाजाची सांगड घालण्याचे कार्य समादेशक संदीप दिवाण, सहाय्यक समादेशक पुरुषोत्तम पाटील व पोलीस उपनिरीक्षक गाडे यांच्याकडून करण्यात येते.


या कार्यक्रमाला वाडीपिरचे उपसरपंच शिवाजी रावळ, कृषिभूषण पुरस्कार प्राप्त विलास कुंभार, राजेश्वरी शिंदे- देसाई, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच आसपासच्या गावातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.