आबोली महिला रिक्षा चालकांनी आरटीओ आणि वाहतूक पोलीस आयुक्त यांना दिले निवेदन

ठाणे : ठाणे शहरात आबोली महिला रिक्षा चालकांची संख्या वाढत चालल्या मुळे, महिलांना ठाणे शहरातील कोणत्याही रिक्षा स्टॅन्ड वर रिक्षा लावण्यास मज्जाव केला जातो, त्यांना प्रवाशी रिक्षात बसवण्यास पुरुष रिक्षा चालक दादागिरी करतात, ठाणे स्टेशन येथे महिलांकरता फक्त एकच रिक्षा स्टॅन्ड असल्यामुळे महिला रिक्षाचालकांच्या स्टॅन्ड पुढे पुरुष रिक्षा चालक जबरदस्तीने रिक्षा लावतात जवळचे भाडे महिलांच्या रिक्षात बसवतात व लांबचे भाडे स्वतः घेऊन जातात, त्या मुळे महिला रिक्षा चालक आणि पुरुष रिक्षा चालक यांच्यात वाद निर्माण होतात, त्या मुळे संतप्त रिक्षा चालक महिलांनी आज ठाणे आरटीओ अधिकारी जयंत पाटील आणि ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्या कडे याबद्दल तक्रार अर्ज दिला,
या मध्ये त्यांनी प्रवाशी भाडे नाकारणाऱ्यात दोषी आढल्यास सगळ्यांवर वर कारवाई करा, तसेच पुरुषांकरता जसे रिक्षा स्टॅन्ड आहेत तसे महिला रिक्षा चालकांसाठी सुद्धा स्टॅन्ड द्या, तसेच महिला रिक्षा स्टॅन्ड पुढे उभ्या करत असलेल्या पुरुष रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.