भारतीय राष्ट्रध्वज अशोकचक्रा विना घेऊन फिरणाऱ्या व फडकवणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहची कारवाई करा! डॉ राजन माकणीकर,
अन्यथा डेमोक्रॅटिक आरपीआय पॅन्थर स्टाईलने ठोकणार

मुंबई दि (प्रतिनिधि) “देशात हर घर तिरंगा” या नुसार जागोजागी तिरंगा फडकवण्यात येत आहे. परंतु अशोक चक्रा विना तिरंगा फडकवणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहा प्रमाणे कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमिक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल द्वारे दिले आहे.
देशाच्या 75 वर्धापण दिनानिमित्ताने नव चैतन्य उभारले आहे. मात्र: अस असताना बाजारात सर्रासपणे भारतीय ध्वज हे अशोक चक्रा विना विक्री केले जात आहेत, किंवा फडकवण्यात येत आहेत अशा प्रकारचे ध्वज. शोभा यात्रेत तर बाईक आणी सायकल रॅली मध्ये देखील वापरण्यात येत आहेत. अशा ठिकाणी व इतरात्र जर अशोक चक्रा विना राष्ट्र ध्वज दिसून आले तर अशा आयोजक प्रयोजक व ध्वज घेऊन फिरणाऱ्यांना पॅन्थर स्टाईलने दणका देणार असल्याचेही पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
विना अशोक चक्र भारतीय राष्ट्रध्वजाची विटंबणा असून अशा अपमान करणाऱ्या व्यक्ती प्रवृत्ती आणी कंपनी वर राष्ट्रद्रोहाची कारवाई करण्यात यावी व मुख्यमंत्री कार्यालयाच्या मार्फतीने संबंध राज्याला तसे निर्देश व आदेश देण्यात यावेत असेही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर म्हणाले.