देश विदेश

नेहरू युवा केंद्र ठाणे द्वारे जिल्हास्तरीय संविधान गौरव दिवस उत्साहात.

सिम्बॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन, मंथन युवा प्रतिष्ठान, वासिंद. जिल्हास्तरीय संस्था मंडळ पुरस्कृत ( महाराष्ट्र शासन ) आणि नेहरू युवा केंद्र ठाणे, युवा कार्यक्रम एवं क्रीडा मंत्रालय, (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सांविधान गौरव सोहळा’ शहापूर , मुरबाड आणि कल्याण विभागात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले भारतीय संविधान हे प्रत्येकाला मुखोतगत व्हावे आणि त्यामध्ये लिहलेल्या कलमनाची तथा आपले हक्क आणि अधिकारांची जाणीव व्हावी या हेतूने विद्यार्थीसाठी.. चित्रकला स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा आणि प्रश्न मंजुषा तसेच संविधान रॅलीचे आयोजन ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड या तालुक्यामध्ये करण्यात आले. यामध्ये या स्पर्धाचे शालेय स्तरावर आयोजन करून, विद्यार्थी-पालक-शिक्षक तसेच प्रत्येक भारतीयांपर्यंत संविधानाचे महत्व पोहचवने असा उद्देश असून..


संविधान जागर या कार्यक्रमामध्ये कल्याण तालुक्यातील वाल्मिकी प्राथमिक / माध्यमिक शाळा अटाळी, दिक्षा कोचिंग क्लासेस टिटवाळा, जी.के. गुरुकुल स्कूल वासिंद, विनायक मार्शल आर्ट्स अँड फिटनेस झोन वासिंद.
कुडवली, मुरबाड. वेडव्हाल गाव इत्यादी गावांचा सहभागी झाले, तर जवळपास 1500 हुन अधिक विद्यार्थी तथा युवक- युवतीनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात 1970 पासून वासिंद परिसर तथा शहापूर तालुका ठाणे जिल्हा बौद्ध धर्माचे अखंड आणि अविरतपणे ज्यांनी कार्य चालू ठेवलं ते धम्म चळवळीतील कार्यकर्ते दि.बु.सो.इंडियाचे शहापूर तालुक्याचे दुसरे माजी अध्यक्ष जिल्हा तथा महाराष्ट्र राज्याचे संघटक दिवंगत महादू चोखा भोसले यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज या संस्थेची स्थापना झाल्यापासून चा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पहिला मरणोत्तर पुरस्कार, ‘आदर्श धम्म कार्यकर्ता’, महाराष्ट्रराज्य हा पुरस्कार त्यांच्या पाश्चात त्यांच्या पत्नी मंदाकिनी महादू भोसले यांना अत्यंत सन्मानपूर्वक शाल, बुके आणि भारतीय संविधानाची उद्देशिका, त्यांचे नावासह सत्कारार्थ अर्पण करण्यात आली. हा सोहळा अत्यंत भावुक आणि रुदयस्पर्शी झाला तर या संस्थेने संस्था निर्मितीपासूनचा पहिला पुरस्कार आदरणीय दिवंगत भोसले गुरुजी यांना देण्यात आला. तसेच आद. कमलताई पगारे यांना मिळालेल्या आदर्श शिक्षिका पुरस्कारार्थी त्यांचा संस्थेच्या वतीने शाल, बुके आणि संविधान उद्देशीका देण्यात आली.


तसेच सांविधानदिना निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा आणि दिवाळीत घेण्यात आलेली किल्ले बांधणी स्पर्धा आणि तालुका स्तरावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (DSO ) यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय कराटे स्पर्धेत समीक्ष चोरगे आणि सुयोग जाधव यांनी मिळवलेल्या सिल्वर मेडल मिळवून होणाऱ्या जिल्हास्तरीय dso कराटे स्पर्धेत निवड झाल्याबद्दल त्यांचे आणि
सर्व स्पर्धाकांना ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज एड्युकेशन असोसिएशन संचालित किंडर जॉय स्कुल , वासिंद येथे बक्षीस वितरण तथा विद्यार्थीचे गुणगौरव करण्यात आले..
तसेच ‘नेहरू युवा केंद्र, ठाणे’ (भारत सरकार ) याच्या अंतर्गत जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या संविधान जागर या कार्यकामाचे आयोजन नियोजन मंथन युवा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांनी केले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनोहर जाधव सर यांनी भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान दिले..


कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून दि.बु. सो.ऑफ इंडिया. ठाणे जिल्हा अध्यक्ष बुधाजी वाढविदे साहेब,दि.बु सो.ऑफ इंडिया उपाध्यक्ष मा.गुरुनाथ गायकवाड साहेब (माजी गट शिक्षणाधिकारी तथा सेवानिवृत्त वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पं. स. शहापूर) , दि.बु. सोसायटी ऑफ इंडिया शहापूर तालुका अध्यक्ष मा. राजू चन्ने,शहापूर मुरबाड सचिव मा. मधुकर साळवले, क.डो.म.पालिकाचे माजी नगर सेवक दशरथ जी तरे साहेब, वाल्मिकी प्राथमिक माध्यमिक शाळेच्या मुख्यध्यापिका नंदा पाटील, छाया पाटील, किंडर जॉय स्कुलच्या संचालिका मुख्यध्यापिका पौर्णिमा गायकवाड. जी.के.गुरुकुल स्कुलचे मुख्यध्यापक योगेश भोईर, गणेश विद्यालय टिटवाळा चे मुख्याध्यापक, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य देविदास भोईर वेहडवाल , आणि ललिता दशरथ गायकवाड वेहळोली. तसेच शहापूर गझालीचे मुख्य संपादक आणि पत्रकार मा. संजय भालेराव, मा. रामभाऊ घोडेस्वार गुरुजी, मा. राजेश निकम मा. मनोज गायकवाड आदी मान्यवर, कला शिक्षक, पालक वर्ग उपस्थित होते.
तसेच संस्थे अंतर्गत स्पर्धे मध्ये सहभागी प्रत्येक शाळेला संविधान पुस्तकं, उद्देशीका आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि बक्षिसांचे वाटप करून संविधान गौरव दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आले.. आणि गणेश विद्यालय येथून निघालेल्या भारतीय सांविधान रॅलीने उपस्थिताचे कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष गणेश गायकवाड यांच्या वतीने उपस्थिताचे आभार मानण्यायात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.