नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा देणारा आणि राष्ट्राभिमान जगविणारा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 3 – भारतीय नौदलाचा नवा ध्वज आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करीत असल्याचे जाहीर केले. शिवरायांच्या राजमुद्रेची प्रेरणा घेऊन नौदलाच नवा ध्वज तयार करण्यात आला आहे.यापूर्वीच्या इंग्रजी सत्तेच्या पारतंत्र्याच्या सर्व खुणा पुसून टाकणारा नौदलाचा नवा ध्वज भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची प्रेरणा देणारा आणि राष्ट्राभिमान जगविणारा ध्वज आहे अशा शबांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी नौदलाच्या नव्या ध्वजाचे स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय नाविक दलाचे नव्या ध्वजाच्या निर्मितीबद्दल आणि विक्रांत सारख्या प्रचंड मोठया भारतीय बनावटीच्या युद्ध नौकेच्या जलावतरणाबद्दल अभिनंदन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत. त्यांनी समुद्र मार्गे होऊ शकणाऱ्या परकीय आक्रमणाचा धोका ओळखला होता.ते पराक्रमी आणि दूरदृष्टी असणारे जाणते राजे होते.नौदलाच्या नव्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छाप असणे हा शिवरायांचा गौरव असून सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. याबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पक नेतृत्वाचे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत असल्याचे ना.रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.