देश विदेश

विवेक* *देवरॉय* यांच्यावर *देशद्रोहाचा* खटला भरण्याची, नाशिक संविधान बचाव कृती समितीची मागणी

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-: देशाचे पंतप्रधान यांचे आर्थिक सल्लागार विवेक देवराय यांनी संविधान बदलण्याबद्दल संविधान विरोधी व देश विरोधी वक्तव्य केल्याबद्दल सविधान बचाव अभियान नाशिक यांच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन देण्यात आले
भारताचे संविधान हे जगातील एकमेव सर्वोत्तम असे लिखित संविधान असून संविधानाने तमाम भारतीयांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायाची संधी मिळते संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला घटनात्मक मानवी अधिकार प्राप्त होत असल्याने जसे संरक्षण, न्याय, धार्मिक, स्वातंत्र्य बोलण्याचा अधिकार व्यापार करण्याची मुभा, शेतकऱ्यांना बाजारपेठ ,राखीव संपत्तीचा अधिकार असे असताना विवेक देवराय सारखे देशद्रोही भारताचे संविधान विरोधी वक्तव्य करून सार्वजनिक शांतता, भारताच्या संविधानाची पायमल्ली करताना दिसुन येत असुन संविधान प्रेमी व भारतीय नागरिकांनी अशा देश विरोधी संविधान विरोधी बोलुन अशा व्यक्तीवर देशद्रोही खटला भरुन भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासाठी अभियान मध्ये
भाग घ्यावा असे आव्हान राष्ट्रीय संविधान बचाव अभियान वतीन करण्यात आलेे

सदरचे वक्तव्य हे जाणीवपूर्वक व नियोजित कोणाच्यातरी वरद हस्ताने निश्चितपणे घडताना दिसून येते यावर हे देशद्रोही थांबले नाहीत तर श्री गौड सारखे नत भ्रष्टांनी संविधानाची प्रत जाळण्याचे देखील प्रकार घडले आहे भारताचा कायदा व राज्यकारभार संविधानानुसार सुरू आहे त्यावरून संविधान बदलण्याची भाषा करणे किंवा संविधान नष्ट करू पाहणाऱ्या देशद्रोहींना वेळीच आटकाव करणे ही आज काळाची गरज असल्याने यापुढे कोणीही संविधान विरोधी वक्तव्य करणार नाही यासाठी कायदेशीर रित्या प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याने यांच्यावर संविधान बदलणे आवश्यक वक्तव्य केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी संविधान बचाव अभियान नाशिक यांच्यावतीने माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली यावेळी एडवोकेट श्री राहुल तूपलोंढे ,डॉ.राजेश साळुंखे ,एडवोकेट भारती पाईकराव, शांताराम दूनबळे निभिॅड पञकार,एडवोकेट श्री स्वप्निल विसपुते, एडवोकेट श्री दत्ता अंभोरे, महिला आघाडी च्या श्रुती नाईक, श्रीमती संध्या धुमाळ , पञकार वर्षा चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.