ताज्या घडामोडी

बदलापूर मध्ये उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना शहर प्रमुखाची प्रतिक्षा,, किशोर पाटील नवीन शहर प्रमुख होण्याची शक्यता,,

बदलापूर! शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला स्वतंत्र गट स्थापन करून आपल्या ५० समर्थक आमदारांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करून महाराष्ट्र राज्यातील सत्ता स्थापन करुन मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले, या मुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह संपूर्ण राज्याला बघायला मिळाला, एकनाथ शिंदे यांना समर्थन देत राज्यभरातुन पहिल्या फळीचे अनेक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले, परंतु दुसऱ्या तिसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पाठ सोडलेली नाही, बदलापुर मध्ये एकहाती शिवसेनेची सत्ता चालवणारे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी देखील एकनाथ शिंदे यांची कास धरून बदलापुर मधुन उध्दव ठाकरे यांची शिवसेना संपली असा भास निर्माण केला, परंतु काही दिवसात शिवसेनेच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या संख्येने थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला,

त्या नंतर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अतुल रावराणे , रुपेश म्हात्रे, किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली बदलापुर पुर्व संजिवनी हॉल मध्ये उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला, या वेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, माजी नगरसेवक,महीला पदाधिकारी मेळाव्यात सहभागी झाले होते,,,,,आणि शिंदे गटा विरुद्ध शिवसेनेचा दुसरा गट बदलापुर मध्ये सक्रिय झाला असल्याचे दिसून आले, या सर्व घडामोडीला आता बरेच दिवस उलटुन गेले आहेत आणि कुळगाव बदलापुर नगरपालिका निवडणुका देखील लवकर जाहीर होणार असल्याने उध्दव ठाकरे प्रणित शिवसेनेचा बदलापुर शहर प्रमुखाची घोषणा लवकरच करण्याची मागणी पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरे यांना केली असून बदलापुर शहराचा नवीन शहर प्रमुख किशोर पाटील यांनाच सर्वानी पसंती दिली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, त्या मुळे आता कीशोर पाटील हेच बदलापुर शहराचे नवीन शहर प्रमुख नियुक्त होणार आहेत अशी माहिती मिळाली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.