आरोग्य व शिक्षण

अंबरनाथ-पं.स.शिक्षण विभाग अंतर्गत ५ सप्टेंबर…शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षक अंबरनाथ तालुकास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ च्या अद्वितिय सोहळ्याचे दिमाखदार आयोजन

*आज दि.०६/१०/२०२२ रोजी पं.स.अंबरनाथ शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त अंबरनाथ तालुक्यातून गुणवंत शिक्षकांना तालुकास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले.*
*या गुणगौरव सोहळ्याचा प्रारंभ ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा (राज्यमंञी दर्जा)सन्माननिय पुष्पाताई गणेश पाटील मॕडम यांच्या शुभहस्ते राष्ट्रपती डाॕ.सर्वपल्ली राधाकृष्णन व विद्येची देवता स्ञीयांच्या उद्धारकर्त्या क्रांतिज्योती साविञीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.

*संगितविशारद सुमधुर आवाजाचे बादशहा श्री.शंकर घोडके सरांनी ” हे शिवसुंदर समर शालीनी ” या ईशस्तवन गीतांचे संगितमय स्तवन केले.तालुक्यातील महीला शिक्षिकांनी सुमधुर आवाजात आलेल्या मान्यवर अतिथींचे गुरुजनांचे स्वागत…स्वागतगीताने केले.* *अंबरनाथ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.आर.डी.जतकर साहेब,योजना प्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.रुचिता भंडारे मॕडम,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.एस.जी.राठोड साहेब,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.कातोड मेंगाळ साहेब यांनी विचारमंचावरील मान्यवर अतिथींचे शाल,गुलाबपुष्प व तुळस वनस्पती भेट देऊन सहर्ष हार्दिक स्वागत केले.


*या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती अंबरनाथ तालुक्याचे सभापती सौ.अनिताताई निरगुडा मॕडम,उपसभापती सौ.तेजश्रीताई जाधव,गटविकास अधिकारी श्री.नारायणसिंह परदेशी साहेब,मा.सभापती,तालुका प्रमुख श्री.बाळारामशेठ कांबरी,समाजसेवक श्री.चैनुदादा जाधव,श्री.मोतीरामदादा निरगुडा,आदर्श काॕलेजचे विद्यमान संस्था अध्यक्ष श्री.जनार्दन घोरपडे दादा,सचिव-श्री.बाविस्कर सर,खजिनदार-श्री.तुषार आपटे इ.ची उपस्थिती प्रार्थनिय होती.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पं.स.सभापती सौ.अनिताताई मोतिराम निरगुडा यांनी भुषविले.*
*स्वागत समारंभानंतर गटशिक्षणाधिकारी श्री.जतकर साहेबांनी प्रास्ताविक मांडले.अंबरनाथ तालुका प्रमुख बाळारामशेठ कांबरी यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करित शिक्षकाचे समाजातील महत्व व शिक्षकांवर असणाऱ्या जबाबदारी बद्दल प्रशंसनिय उदगार काढले.गटविकास अधिकारी श्री.नारायणसिंह परदेशी साहेबांनी देखील शिक्षक दिनी आपले अनमोल मार्गदर्शन केले.*
*आदर्श काॕलेज संस्थेचे खजिनदार श्री.बाविस्कर सर यांनी आपले विचार प्रकट केले.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.पुष्पाताई पाटील या आदर्श शाळेच्या माजी विद्यार्थीनी म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री.जनार्दन घोरपडे यांनी ताईंचा स्वतंञ यथोचित सत्कार करुन गौरवोदगार काढले*
*जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननिय सौ.पुष्पाताई गणेश पाटील मॕडम यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करित जिल्ह्यात A for AMBERNATH तालुका गुणवत्तेत अव्वल ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले.ठाणे-पालघर विकल्प विपरित शिक्षकांना स्व जिल्ह्यात आणण्यासाठी सकारात्कता दर्शवली.अपू-या शिक्षक संख्ये अभावी शिक्षण क्षेञावर आलेला ताण शिक्षकांवरील ताण याबाबत आपण जागरुक असून याबाबत जिल्ह्यात तासिका पद्धत राबविणार असल्याचे सुतोवाच केले.कोविड काळातील शिक्षकांची कर्तव्यभावना,मानवतावाद व विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून केलेले आॕनलाईनद्वारे अध्यापन या बाबींचे विशेष कौतुक केले.शाळांना भौतिक सुविधेकरिता अंबरनाथ तालुक्यातील शाळांना कुठेच निधी कमी पडू देणार नाही.गुरुमहीमा बद्दल गौरवोदगार काढले.उत्कृष्ट सुञसंचालन करणारे शिक्षक अॕड.हेमंत झुंझारराव यांचा ताईंकडून विशेष सत्कार करण्यात आला.*
*तालुक्यात काही शिक्षकांकडून*
*शिष्यवृत्ती परिक्षेकरिता नियोजित आॕनलाईन वर्ग चालविणा-या होतकरु शिक्षकांचे विशेष कौतुक व स्टेजवर बोलवून सन्मानित केले.Five star रेटींग शाळा…स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्राप्त शाळा-ढोके दापिवली व आघाणवाडी शाळेला प्रमाणपञ देऊन पुष्पगुच्छ देऊन शाळेतील शिक्षकांचा सत्कार केला.यशोगाथा संकलनकर्ते तंञस्नेही श्री.शाम माळी सरांचे कौतुक व सन्मान जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले.तसेच गतवर्षील जिल्हा पुरस्कार प्राप्त श्री.होटकर सर आणि श्री. बनसोडे सर यांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे ४०० हून अधिक शाळेच्या माहितीचे अचुक संकलन ठेवणाऱ्या, सौ. सुप्रिया देशमुख मॕडम यांचाही सत्कार करण्यात आला.*
*या गोड अनोख्या कार्यक्रमाचे बहारदार शब्दांच्या आतिषबाजीचे आगळे वेगळे सुञसंचालन अॕड.हेमंत झुंजारराव सरांनी उत्कृष्ट पद्धतीने करित सभागृहातील सर्वांची मने जिंकली.*
*यानंतर तालुक्यातील १० केंद्रातील निवडक गुणवंत शिक्षकांना सन्मानचिन्ह शाल व गुलाबपुष्प देऊन मान्यवर अतिथींच्या हस्ते सन्मानित केले.


🎊🌹 *आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्तीची नांवे-केंद्र व शाळा निहाय*🌹🎊

*१.सौ.डाॕ.वर्षा अंबाडे मॕडम शाळा-उसाटणे,केंद्रःकरवले*

*२.सौ.बीना भुतांगे मॕडम शाळा-कोल्हेवाडी,केंद्रः कान्होर*

*३.सौ.रंजना पाटील मॕडम शाळाःधामणवाडी, केंद्रः दहीवली*

*४.सौ.कविता दुर्गे मॕडम शाळाःपिंपळोली,केंद्रः पिंपळोली*

*५.सौ.शर्वरी साबळे मॕडम शाळा-कु-हाडपाडा,केंद्रः बोराडपाडा*

*६.सौ.राजश्री भावसार मॕडम शाळाःमाणेरे,केंद्रःभाल*

*७.सौ.संगिता चौधरी मॕडम.. शाळाःगोरपे,केंद्रः चिखलोली*

*८.श्री.जगदिश पवार सर शाळाःढोके,केंद्रःमांगरुळ*

*९.सौ.माधुरी फालक मॕडम शाळाःचोण,केंद्रःमुळगांव*

*१०.सौ.मनिषा जाधव मॕडम …शाळाःवांगणी क्रं.३,केंद्रःवांगणी*

*यावेळी टाळ्यांचा अभिनंदन वर्षाव पहायला मिळाला.सभागृहात उपस्थित शिक्षकांची उपस्थिती लक्षनिय पहायला मिळाली.*
*उपस्थितांना पं.स.शिक्षण विभागातर्फे स्नॕक्स नाश्ता म्हणून देण्यात आला.या कार्यक्रमाला पञकार मिञांचीही उपस्थिती लाभली.तालुक्यातील शिक्षक संघटना प्रमुखांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य केले.*
*समग्र शिक्षा अभियान टिमचेही विशेष श्रम व सहकार्य लाभले.*
*सरतेशेवटी गटशिक्षणाधिकारी श्री.आर.डी.जतकर साहेब यांनी सर्वांचे शिक्षण विभागातर्फे शतशःआभार मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.