क्राईम

30,00,000/- रू किंमतीचे 2 किलो 60 ग्रॅम चरस हे अंमली पदार्थ गुन्हे शाखा घटक 5 वागळे इस्टेट ठाणे यांच्या कडुन जप्त ’’

मा.वरिष्ठांकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या असामाजिक घटकांचा शोध घेवुन कायदेशीर कारवाई करण्यासंबधीत दिलेल्या सुचनांची नोंद घेवुन, गुन्हे शाखा, घटक 5 वागळे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार घटक 5 कार्यक्षेत्रात अंमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या, अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या व्यक्तींचा षोध घेवुन कायदेषिर कारवाई करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास घोडके यांना प्राप्त बातमीच्या आधारे मंगला हायस्कुल जवळ, ठाणे रेल्वे स्टेशन कोपरी येथे रोडवर सापळा रचुन 1) प्रशांत कुमार रामबाबु सिंग, वय 27 वर्षे, रा. परसावणी, जि. सितामढी, बिहार व 2) प्रेमशंकर लक्ष्मीनारायण ठाकुर, वय 23 वर्शे, रा. रा. परसावणी, जि. सितामढी, बिहार हे मोठया प्रमाणात चरस हा अंमली पदार्थ विक्री करीता आले असता त्याचे कब्जात 30,00,000/- रू (तीस लाख रूपये) किंमतीचे 2 किलो 60 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या फायदयाकरीता कब्ज्यात बेकायदेशिररित्या बाळगला असता मिळुन आला म्हणून त्याचे विरूध्द कोपरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.ाा 167/2023 एन.डी.पी.एस.अ‍ॅक्ट 1985 चे कलम 8(क), 20(ब), ाा (क),29 प्रमाणे दि.25/08/2023 रोजी गुन्हा दाखल केला असुन यातील आरोपी हे दि.29/08/2023 पावेतो पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहे. यातील आरोपीतीचे अंगझडती मध्ये नेपाळी चलनी नोटा मिळालेल्या असून सदरचा अंमली पदार्थ त्यांनी नेपाळ मधून आणला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.याअनुषंगाने अधिक त्यास वरिष्ठ याचे मादर्शना खाली सुरू आहे. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा घटक 5 चे सहा.पोलीस निरीक्षक भुशण शिंदे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री जयजित सिंग साो, मा.पोलीस सह आयुक्त श्री दत्तात्रय कराळे साो, मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे डाॅ श्री पंजाबराव उगले साो, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील सोा, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त ( शोध 1) श्री निलेश सोनावणे सोा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, वागळे युनिट-5, ठाणे चे वरिष्ठ पो.निरी. विकास घोडके, स.पो.निरी/भुशण षिंदे, स.पो.निरी/अविनाश महाजन, पो.हवा/अजय साबळे, पो.हवा/रोहीदास रावते, पो.हवा/सुनिल रावते, पो.हवा/संदिप शिंदे, पो.ना/रघुनाथ गार्डे, पो.ना/तेजस ठाणेकर, म.पो.हवा/मिनाक्षी मोहीते, चा.पो.काॅ/यश यादव, या पथकाने केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.